December 10, 2025 5:06 am

अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरां – श्री. संदीपकुमार साळुंखे यांना “सर्वोत्तम सेवा पदक”

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरां – श्री. संदीपकुमार साळुंखे यांना “सर्वोत्तम सेवा पदक”

 

अमळनेर : विक्की जाधव 

अमळनेर तालुक्यातील सुपुत्र आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी श्री. संदीपकुमार साळुंखे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यगौरवासाठी “सर्वोत्तम सेवा पदक” या राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार त्यांना केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या हस्ते २४ जुलै – आयकर दिवस या दिवशी दिल्लीत विज्ञान भवन येथे झालेल्या भव्य समारंभात प्रदान करण्यात आला.

श्री. साळुंखे यांनी आयकर विभागात केलेल्या पारदर्शक, प्रभावी आणि जनहितकारी कार्यासाठी त्यांची ही निवड करण्यात आली. त्यांनी अनेक संवेदनशील प्रकरणांमध्ये परिणामकारक हस्तक्षेप करत नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे विभागाची प्रतिमा उंचावली असून, इतर कर्मचाऱ्यांसाठी ते एक प्रेरणास्थान ठरले आहेत.

या पुरस्कारामुळे संदीपकुमार साळुंखे यांचे केवळ वैयक्तिक नव्हे, तर अमळनेर तालुक्याचेचेही नाव संपूर्ण देशभरात उजळले आहे. त्यांचा हा सन्मान सर्व अमळनेरवासीयांसाठी अभिमानास्पद क्षण आहे. स्थानिक पातळीवरून राष्ट्रीय मंचावर पोहोचलेले साळुंखे साहेब हे युवकांसाठी प्रेरणादायी उदाहरण बनले आहेत.

या गौरवप्राप्तीनंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!