विकृत संचालक! – प्रतिष्ठित संस्थेचं नाव बुडवायला निघाला आंबट शौकीनाचा भांडा फुटणार 

अपनी भाषा में पढ़े! Translate

विकृत संचालक! – प्रतिष्ठित संस्थेचं नाव बुडवायला निघाला आंबट शौकीनाचा भांडा फुटणार 

 

स्वतःला भलता चलाख समजणारा, गडगंज संपत्ती असूनही भ्रष्ट आणि अनैतिक कृत्यांमध्ये गुंतलेला (त्याचे नावं घेऊन त्याची प्रतिमा अजून मालीण करू इच्छित नाही.)

एक संचालक,  अखेर रंगेहात पकडला गेला! उच्च दर्जाच्या शिक्षणसंस्थेच्या नावावर डाग आणणाऱ्या या व्यक्तीविरोधात गावात मोठी खळबळ माजली आहे.

अनैतिक कृत्य करताना लोकांच्या नजरेच्या सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतरही, भरगच्च पैसे देत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला. लाखोंची सेटलमेंट, आणि काही मध्यस्थी ‘गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांच्या’ हस्तक्षेपामुळे अटक टळली, अशी खात्रीलायक माहिती आहे. मात्र ‘मांजर दूध पितेय”” ही म्हण इथे खरं ठरत असल्याची चर्चा आहे.

या प्रकरणात जरी एका महिलेला तोंड बंद ठेवण्यासाठी नाममात्र मोबदला दिला गेला असला, तरी आता सत्य हळूहळू बाहेर येत आहे. काही सामाजिक कार्यकर्ते या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी यासाठी पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत. असेही कळते. कार्यवाही ची मागणी आणि चौकशीतं कोणकोणची झाडझडती होते हे महत्वाचे ठरणार आहे. 

या तपासात आणखी अनेक धागेदोरे उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाण्याची चिन्हे आहेत.

हे प्रकरण केवळ एक व्यक्तीपुरते न राहता, एका संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं करतं आहे. आता ही चौकशी कुठपर्यंत जाते आणि कोणकोणाला वाचवण्याचे प्रयत्न होतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल!

पुढील वृत्त लवकरच.

वाचत रहा मार्मिक समाचार

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!