अमळनेरमध्ये अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट! पाचव्या मजल्यावर विजेचा शॉक लागून कामगाराचा मृत्यू, ठेकेदार आणि इमारत मालकांवर चौकशीचा धसका

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरमध्ये अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट! पाचव्या मजल्यावर विजेचा शॉक लागून कामगाराचा मृत्यू, ठेकेदार आणि इमारत मालकांवर चौकशीचा धसका

अमळनेर : विक्की जाधव 

अमळनेर शहरात विविध भागांत सर्रास अनधिकृत बांधकाम सुरू असून, शहराच्या कडेला बिल्डर्सचा धुमाकूळ दिसून येतोय. नागरिकांतून आता प्रश्न उपस्थित होतोय की, प्रशासन या बेकायदेशीर बांधकामांना आळा घालणार की नाही?

या पार्श्वभूमीवर, मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील सुधामपूर येथील विनायक (वय 20) या तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी तो अमळनेरमधील चोपडा रोड लागत एका पाच मजली इमारतीवर काम करत असताना, विजेचा शॉक बसल्याने त्याचा मृत्यू झाला. विनायक सेंट्रिंग ठेकेदार हिरालाल बाबुराव गांगुर्डे यांच्याकडे काम करत होता.

या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय नामदेव बोरकर करत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!