पातोंड्यात अनधिकृत वाळू वाहतूक  महसूल विभागाची धडक कारवाई, डम्पर जप्त

अपनी भाषा में पढ़े! Translate

पातोंड्यात अनधिकृत वाळू वाहतूक  महसूल विभागाची धडक कारवाई, डम्पर जप्त

 

अमळनेर : विक्की जाधव 

अमळनेर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनधिकृत वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून, नागरिकांकडून सातत्याने कारवाईची मागणी केली जात होती. विशेषतः पातोंडा, खौशी, सावखेडा या भागांमध्ये वाळूची बेकायदेशीर वाहतूक उघड उघड सुरू होती, मात्र ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर आज पातोंडा येथे एक मोठी कारवाई करण्यात आली. महसूल विभागाच्या पथकाने अनधिकृत वाळू वाहतूक करणारे एक ढपर अडवले असून, ते पुढील कार्यवाहीसाठी अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. या कारवाईमुळे तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर अंकुश बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या संयुक्त कारवाईत तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या नेतृत्वाखालील पथक सक्रिय होता. त्यांच्यासोबत ग्राम महसूल अधिकारी पवन शिंगारे (सावखेडा), अनिल पवार (मठगव्हाण), महसूल सेवक रोहित बैसाणे (पातोंडा), प्रदीप पाटील (खौशी) तसेच पोलिस पाटील भरत निकम (मुंगसे), राहुल पवार (खौशी) आणि महेश पाटील (धावडे) हे अधिकारी उपस्थित होते. या कारवाईमुळे महसूल प्रशासनावरील लोकांचा विश्वास पुन्हा दृढ झाला असून, आगामी काळात अशा प्रकारच्या अधिक धडक मोहिमा राबवाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यातील अन्य भागांतही अशाच प्रकारे कारवाई व्हावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. अनेक ठिकाणी आजही वाळू चोरीचे प्रकार सुरु आहेत, त्यामुळे सतत गस्त, गुप्त माहितीचे संकलन व कठोर दंडात्मक कारवाईची गरज आहे, असेही स्थानिकांनी सांगितले.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!