एस.टी.चा काळा खेळ उघड! भगवान जगनोरांच्या कारनाम्यांवर किरण धनगरांचा प्रहार 

अपनी भाषा में पढ़े! Translate

एस.टी.विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा काळा खेळ उघड! भगवान जगनोरांच्या कारनाम्यांवर किरण धनगरांचा प्रहार 

 

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव 

जळगाव एस.टी. विभागात गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या लाखो रुपयांच्या गैरव्यवहाराचा भंडाफोड झाला असून, या प्रकरणात तत्कालीन विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

हा संपूर्ण प्रकार परिवहन महामंडळाच्या अंतर्गत कारभारातील गडबडीचे जिवंत उदाहरण ठरत आहे. भगवान जगनोर हे एकाच जिल्ह्यात, एकाच पदावर सलग चार वर्षे कार्यरत होते. त्यांनी जळगाव एस.टी. विभागात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता केली असून, चालक व वाहक यांच्या पदोन्नतीसाठी लाच घेतल्याचा आरोप आहे. त्यांनी जळगाव नांदगाव इ. ठिकाणी प्रॉपर्टी घेतल्याचे ही समजते हे सर्व प्रकरण उजेडात आणण्याचे धाडस केले आहे किरण धनगर यांनी. संबंधित पुरावे सादर करत विभागीय व्यवस्थापनासमोर हा घोटाळा मांडला. यामुळे एस.टी. महाव्यवस्थापनात मोठी खळबळ उडाली आहे.

एवढेच नव्हे तर, भगवान जगनोर यांनी त्यांच्या कौटुंबिक वादातून त्यांच्या आईला देखील एका प्रकरणात कोर्टात खेचले होते, त्या खाजगी प्रकरणात तारखांना उभे असताना भगवान जगनोर यांनी एस टी प्रशासनाकडून पगार घेतला असल्याने त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहे.

या प्रकरणी शासनदरबारी तक्रारी दाखल झाल्या असून, काही ठिकाणी चौकशी सुरू आहे. किरण धनगर यांनी मार्मिक सोबत बोलताना सांगितले की, “सरकारी यंत्रणेला शांत बसू दिलं जाणार नाही, लोकांचा पैसा खाणाऱ्यांना जवाब द्यावा लागेल!”

या पार्श्वभूमीवर आता एस.टी. महामंडळ आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!