करमाळा :- करमाळा तालुक्याची आमसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा तालुकाध्यक्ष संजय घोलप यांच्या मागणीनुसार तब्बल 12 वर्षातून घेण्यात आली. आमसभा दि .30 /5/ 2025 शुक्रवार या रोजी पार पडली अनेक नागरीकांनी त्या साठी एक महिना अगोदर करमाळा गटविकास अधिकारी आमसभा सचिव यांच्या आदेशानुसार तालुक्यातील नागरीकांनी आपले प्रश्न लेखी अर्ज करून व ऑनलाईन पध्दतीने पंचायत समितीत सादर केले होते.
आमसभेसाठी 200 च्या वरती प्रश्न नागरिकांनी लेखी व ऑनलाईन पाठवले होते परंतु वेळेअभावी काही काही प्रश्नांना आमसभेत उपस्थित केले गेले नाही. त्यामुळे संजय घोलप मनसे तालुकाध्यक्ष यांनी उपस्थित न करता आलेले प्रश्नांची उत्तरे लेखी स्वरुपात मिळावीत म्हणून वर्तमान पत्रातुन मागणी केली होती.
आमसेभे दिवशी सुरवातीपासून आधिकारी आढावा, सत्कार, समारंभ असे कार्यक्रम घेण्यात आले त्यामुळेच नागरिकाना आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संधी वेळे आभावी मिळाली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी सर्वामान्याना न्याय मिळावा या उद्देशाने त्यांनी करमाळा गटविकास आधिकारी यांना वर्तमानपत्रातून सर्व आमसभेतील आलेल्या प्रश्नांना लेखी उत्तरे द्यावीत अशी मागणी केली होती
त्यामुळेच आज गटविकास आधिकरी यांनी आमसभा सचिव म्हणुन सर्व शासकीय ऑफिस अधिकारांना त्यांची लेखी उत्तरे आठ दिवसाच्या आत द्यावीत असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा तालुकाध्यक्ष मा.संजय घोलप यांच्या बातमीचा संदर्भ देऊन आदेश काढले आहे
तालुक्यातील नागरिकांनी घोलप यांना भेटुन फोनद्वारे समाधान व्यक्त करून आभार मानले ..
जरं समाधान कारक उत्तरे नाही मिळाली तरी आपण सर्व मिळून तालुक्यातील नागरींकांच्या हितासाठी सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करू असे नागरीकांना घोलप म्हणाले आहेत.