भांड्यांच्या वाटपावरून महिलांचा संताप उसळला!
Breaking news
आ. अनिल पाटील यांच्या निवासस्थानाजवळ धडक मोर्चा बहुगुणे हॉस्पिटल जवळचा मुख्य रस्ता ठप्प!
अमळनेर : विक्की जाधव
सरकारच्या स्वयंपाक भांडे वाटप योजनेत होत असलेल्या दिरंगाईवरून अमळनेर शहरातील असंख्य महिलांचा संताप बुधवारी उफाळून आला. हातात आधार कार्ड व अर्ज घेऊन आलेल्या महिलांनी थेट आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या निवासस्थानाजवळ मोर्चा नेला. यावेळी महिलांनी शहरातील सुप्रसिद्ध बहुगुणे हॉस्पिटल जवळून जाणारा मुख्य रस्ता आडवत ठिय्या आंदोलन सुरू केले. रस्त्यावर ठिय्या देत महिलांनी “हक्काचं भांडे दया – नाहीतर खुर्ची खाली करा!”, “योजना फसव्या नाही पाहिजे!” अशा जोरदार घोषणा दिल्या. सकाळपासून वाढत गेलेल्या गर्दीमुळे परिसरात वाहतूक ठप्प झाली असून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
महिला म्हणाल्या, “आम्ही कोणतीही भीक मागत नाही, आमचा हक्क मागतोय!”
या आंदोलनामुळे प्रशासनासह लोकप्रतिनिधींवर ताशेरे ओढले जात असून, योजना प्रभावीपणे राबवली जात नसल्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.