“हातात आधार कार्ड, डोळ्यात आशा… पण भांड्यांचा लाभ अजूनही नाही!”

अपनी भाषा में पढ़े! Translate

“हातात आधार कार्ड, डोळ्यात आशा… पण भांड्यांचा लाभ अजूनही नाही!”

 

अमळनेर :  विक्की जाधव

“म्हणूनच म्हणतात, योजना आहेत पण त्यांचं नियोजन कुठंय?” — अशी उपरोधिक प्रतिक्रिया अमळनेर तालुक्यातील अनेक बंधकाम महिला व पुरुष कामगारांनी व्यक्त केली. शासनाच्या भांडी वाटप योजनेतून लाभ मिळावा यासाठी शेकडो कामगारांनी धुळे रोडवरील वितरण केंद्रावर तासनतास उभं राहत प्रतिक्षा केली. मात्र, पुन्हा एकदा त्यांना रिकाम्या हाताने माघारी परतावं लागलं.

“पात्र असूनही लाभ नाही” – महिलांचा संताप

राज्य शासनाच्या  ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा’ मार्फत राबविण्यात येणाऱ्या भांडी वाटप योजनेचा लाभ मिळावा यासाठी पात्र कामगारांची यादी तयार करण्यात आली आहे. मात्र यादीत नाव असूनही वाटप होत नसल्यानं संतप्त महिला म्हणाल्या, “आम्ही पात्र आहोत, ऑथोरायझेशन पत्र आहे, तरी भांडी नाहीत, केवळ आश्वासनंच!”

कामगारांच्या भावनांशी खेळ ?

धुळे रोडवरील वितरण केंद्रावर गेले अनेक दिवस कामगार गर्दी करत आहेत. योजनेचा लाभ मिळेल, या आशेने आधार कार्ड, कागदपत्रे घेऊन सकाळपासून उभे राहतात. काही वेळाने कार्यालय उघडते, नावांची पडताळणी होते – पण भांडी मात्र दिसत नाहीत. “चार वेळा आलो, तासन्‌तास उभं राहिलो, तरी मिळालं काय?” असा सवाल एका वृद्ध कामगार महिलेने केला.

स्थानिक लोकप्रतिनिधींवरही सवाल

कामगारांच्या या समस्या वारंवार घडत असताना, स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही महिला कामगारांनी केला आहे. त्यांनी सांगितलं की, “आम्ही फक्त निवडणुकीच्या वेळी आठवतो, नंतर आमच्या अडचणी कुणालाही दिसत नाहीत.”

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!