नगर परिषदेच्या फायर विभागात अपात्र कर्मचाऱ्यांची नेमणूक ? फायर कर्मचारी अशिक्षित असल्याचा आरोप
पत्रकार, विक्की जाधव
अमळनेर नगर परिषदेच्या फायर विभागावर गंभीर आरोप करण्यात आले असून, विभागातील काही कर्मचारी पूर्णपणे अशिक्षित असून त्यांनी कोणत्याही प्रकारचा फायर सेफ्टी कोर्स पूर्ण केलेला नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते परेश उदेवल यांनी केला आहे.
त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “शहरात आगीच्या घटना वाढत असताना फायर विभागात प्रशिक्षित आणि पात्र कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र येथे जे कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांच्याकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा प्रशिक्षण नाही.”
या प्रकरणात त्यांनी अमळनेर न. पा. चे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी वेळोवेळी केली आहे. सहा दिवसात कार्यवाही न झाल्यास विविध स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने मुख्याधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालून सक्षम आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, असेही उदेवल यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात नगर परिषदेच्या संबंधित विभागाचे उत्तर अद्याप आलेले नाही. मात्र हा प्रकार समोर आल्याने नागरीकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
अशा पद्धतीने अंदोलक करणार आंदोलन काचेसमोर काळी फित लावून निषेध, घंटानाद आंदोलन, निवेदनाच्या प्रतींचे प्रतीकात्मक दहन, ढोल वाजवत कार्यालयासमोर निदर्शन, नगरपरिषद ते स्मशानभूमी मूक पदयात्रा, शहरात डिजिटल बॅनर लावून जनजागृती, कार्यालयाबाहेर झेंडा लावून ठिय्या आंदोल करण्यात येईल.
सामाजिक कार्यकर्ते. परेश उदेवल यांनी बोलतांना म्हटले की, प्रशासनाकडे वारंवार मागणी करून देखील उत्तर मिळत नसल्याने आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. ६ दिवसांत योग्य ती कारवाई झाली नाही, तर ७ व्या दिवशी आंदोलन सुरू करण्यात येईल, असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे.
