महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक २०२४ विधानपरिषदेत मंजूर ठाकरे गटाकडून विरोधाचा निर्धार!
मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव
राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाणारे ‘महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक – २०२४’ हे विधेयक विधानपरिषदेत मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकाद्वारे राज्यात समाजविघातक आणि गँगवारसारख्या घटना रोखण्यास सरकारला अधिक अधिकार मिळणार आहेत. मात्र, या विधेयकावरून राजकारण तापले असून ठाकरे गटाने उघड विरोध दर्शवला आहे. ठाकरे गटाचे नेते व विधानपरिषदेतील आमदार यांनी “हे विधेयक सर्वसामान्य नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणणारे आहे”, असा आक्षेप घेत राज्यपालांना यावर स्वाक्षरी न करण्याची विनंती करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
ठाकरे गटाचे आरोप :
हे विधेयक दडपशाहीचे हत्यार ठरू शकते. राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी त्याचा गैरवापर होण्याची शक्यता.लोकशाहीच्या मूल्यांविरोधात पाऊल.
सरकारचे म्हणणे :
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना गरजेच्या.
जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न सर्वोपरि.
– न्यायिक नियंत्रणाखाली कारवाई होणार असल्याने गैरवापराची शक्यता नाही. दरम्यान, या विधेयकाची अंमलबजावणी होण्यासाठी आता राज्यपालांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांकडून त्याच्या घटनाबाह्य बाबींवरही चर्चा रंगत असून, यामुळे पुढील काही दिवसात विधेयकाच्या भवितव्याबाबत मोठी राजकीय चाचपणी होण्याची शक्यता आहे.