महा एनजीओ फेडरेशन व स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था मदनवाडी यांच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त योग्य यज्ञ आयोजित करण्यात आला होता
(निलेश गायकवाड)
जागतिक योग दिनानिमित्त महा एनजीओ फेडरेशन व स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने पुणे करिअर अकॅडमी येथे योग दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. पुणे करिअर अकॅडमी मधील विद्यार्थ्यांनी योगासने करून योग दिन साजरा केला यामध्ये योगा विषयी माहिती देण्यात आली.
यावेळी योग शिक्षक म्हणून भिगवण पोलीस स्टेशनचे श्री देवकर साहेब लाभले होते. यावेळी पुणे करिअर अकॅडमीचे राजकुमार शेंडगे सर स्वर्गीय शंकरराव सोट पाटील बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुरज सोट पाटील व संस्थेचे सचिव धीरज सोट पाटील उपस्थित होते.