दारूप्रेमींना जोरदार धक्का – देशी ते विदेशी सगळेच महागले
मार्मिक न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्रातील मद्यप्रेमींसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार आता देशी दारूचा दर 80 रुपये आणि ‘महाराष्ट्र मेड’ विदेशी दारूचा दर थेट 148 रुपये इतका करण्यात आला आहे.
भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर 1.5% अतिरिक्त उत्पादन शुल्क लावण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीत 14,000 कोटी रुपयांची भर पडणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात येतो.
मात्र, या दरवाढीचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य तळीरामांना बसणार आहे.