June 28, 2025 11:48 pm

”हुंडा देणार नाही अन् घेणारही नाही”,मंगळ ग्रह मंदिरात भाविकांना देण्यात आली सामूहिक शपथ

अपनी भाषा में पढ़े! Translate

”हुंडा देणार नाही अन् घेणारही नाही”,मंगळ ग्रह मंदिरात भाविकांना देण्यात आली सामूहिक शपथ

 

अमळनेर : विक्की जाधव 

राज्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याशिवाय भारतीय संस्कृतीला फाटा देत पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (१० जून) रोजी येथील मंगळ ग्रह मंदिरात ”हुंडा देणार नाही अन् घेणारही नाही”, अशी सामूहिक शपथ घेण्यात आली. दरम्यान, मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनाही कायमस्वरूपी ही शपथ देण्याचा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती मंगळ ग्रह मंदिर संस्थांतर्फे देण्यात आली. यावेळी अमळनेर मंगळग्रह मंदिराचे अध्यक्ष डिगंंबर महाले, उपाध्यक्ष एस. एम. पाटील , सहसचिव दिलीप बहीराम, विश्वस्त अनिल अहिराव, वसुंधरा ताई लांडगे, माजी आमदार कृषीभुषण साहेबराव पाटील, जि. प. माजी सदस्या जयश्री पाटील, प्रांत नितीन मुंडावरे, डीवाय एस. पी. विनायक कोते, पी. आय. निकम, नगर परिषदेचे सिईओ तुषार नेरकर, स्वच्छता निरीक्षक संतोष बिर्‍हाडे, न.प कर्मचारी, महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे जिल्हा अधिकारी करणसिंग राजपूत, राजेन्द्र सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

अशी घेण्यात आली शपथ

आम्ही, सर्व शक्तिमान, सर्वसाक्षी परमेश्वरासमोर गांभीर्यपूर्वक शपथ घेतो, की आमच्या कुटुंबातील लग्न अत्यंत साधेपणाने लावू, कोणताही बडेजावपणा करणार नाही. लग्नासाठी कर्ज काढणार नाही.

पारंपरिक भारतीय तथा हिंदू संस्कृतीप्रमाणेच लग्न लावू, आपल्या पारंपरिक संस्कृतीत नसलेल्या प्री-वेडिंग शूट, रिंग सेरेमनी यासारख्या अन्य कोणत्याही गैरप्रथा स्वीकारणार नाहीत. शक्यतो साखरपुडा, हळद व लग्न एकाच दिवशी आटोपण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. अत्यंत मोजक्या लोकांनाच लग्नाला बोलवू. हुंडा देणार नाहीत अन् घेणारही नाहीत.

मुलाच्या नात्याने आई-वडिलांची तर सुनेच्या नात्याने सासू-सासऱ्यांची मनोभावे सेवा करू. त्यांना कधीही वृद्धाश्रमात पाठवणार नाहीत. भाऊ-बहिणींमध्ये कधीही वाद‌विवाद होऊ देणार नाहीत. त्यांना सर्वतोपरी मदत करू.

सुनेला मुलीसारखे वागवू, घरात कोणत्याही प्रकारचा कौटुंबिक हिंसाचार होऊ देणार नाही. सुनेच्या माहेरातील कुटुंबीयांना नेहमी आदराने वागवू. मुलीच्या संसारात कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करून समस्या निर्माण होऊ देणार नाहीत. कायम व्यसनमुक्त राहू.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!