June 28, 2025 1:51 pm

पिनकोडला रामराम! ‘डिजीपिन’ प्रणालीस भारतीय पोस्ट विभागाची मान्यता

अपनी भाषा में पढ़े! Translate

पिनकोडला रामराम! ‘डिजीपिन’ प्रणालीस भारतीय पोस्ट विभागाची मान्यता

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव 

भारतीय पोस्ट विभागाने देशभरातील पत्त्यांचे अचूक स्थान सांगण्यासाठी नवी ‘डिजीपिन’ प्रणाली जाहीर केली आहे. आता पारंपरिक पिनकोडऐवजी प्रत्येक पत्त्याला एक स्वतंत्र, दहा अंकी डिजिटल पत्ता म्हणजेच ‘डिजीपिन’ दिला जाणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून शहर, गाव आणि घराचा अचूक पत्ता एका 10-अंकी डिजीटल कोडमधून समजणार आहे. प्रत्येक 4×4 मीटरच्या क्षेत्राला एक वेगळा डिजीपिन मिळणार असून, यामुळे अचूक पत्ता शोधणे अधिक सुलभ होणार आहे. ही प्रणाली इंडिया पोस्ट, IIT हैदराबाद, NRSC आणि ISRO यांच्या संयुक्त सहकार्याने विकसित करण्यात आली आहे.

ही पद्धत पारंपरिक पत्ता व्यवस्थेचा पर्याय ठरण्याची शक्यता असून, ई-कॉमर्स, आपत्कालीन सेवा, वितरण व्यवस्था यामध्ये मोठा बदल घडवून आणणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!