न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261129-WA0694 अखेर अमळनेरचा कत्तलखाना जमीनदोस्त; तीन उपोषणकर्त्यांचे उपोषण मागे! हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेत ठराव क्रमांक २०२ मंजूर, खासदार स्मिता वाघ यांचा भक्कम पाठपुरावा,६५ पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाई

WhatsApp Image 2026-11-28 at 2.11.11 PM दौंड रेल्वे जंक्शनवर आगीचे तांडव! प्लॅटफॉर्म क्रमांक ३ अंधारात; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

WhatsApp Image 2026-11-28 at 6.09.52 PM अखेर अनधिकृत कत्तलखान्यावर प्रशासनाचा हातोडा! प्रशासनाच्या कारवाईनंतर आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त करत उपोषण मागे घेण्याची भूमिका घेतली.

Screenshot 2026-11-28 163446vfd bdf छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न सुरक्षा विभागाचा मोठा दणका! १२ हॉटेल, कॅन्टीन, मिठाई दुकानांचे परवाने निलंबित; अस्वच्छतेचे गंभीर प्रकार उघड

IMG-20261127-WA1624(1) स्व. उदय भिकनराव वाघ यांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन

अखेर अमळनेरचा कत्तलखाना जमीनदोस्त; तीन उपोषणकर्त्यांचे उपोषण मागे! हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेत ठराव क्रमांक २०२ मंजूर, खासदार स्मिता वाघ यांचा भक्कम पाठपुरावा,६५ पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाई

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261129-WA0694

अखेर अमळनेरचा कत्तलखाना जमीनदोस्त; तीन उपोषणकर्त्यांचे उपोषण मागे!

हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेत ठराव क्रमांक २०२ मंजूर, खासदार स्मिता वाघ यांचा भक्कम पाठपुरावा,६५ पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाई

 

अमळनेर : विक्की जाधव.

शहरातील गोवंश कत्तलीच्या घटनांवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जनआक्रोश आंदोलनाला अखेर यश आले असून नगरपरिषदेचा कत्तलखाना शनिवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी जमीनदोस्त करण्यात आला. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि गोरक्षक हिंदू संघटनांनी कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करून जमीनदोस्त करण्याच्या मागणीसाठी उभारलेल्या आंदोलनानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीने विशेष सभेत ठराव मंजूर केला.

त्यानंतर मुख्याधिकारी रोशन राजपूत यांनी अतिक्रमण विभागाला कारवाईचे आदेश दिले. सायंकाळी पाचच्या सुमारास सात पोलीस अधिकारी आणि ६५ पोलिसांच्या बंदोबस्तात नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने कत्तलखान्याची इमारत निष्कासित केली. या कारवाईनंतर खासदार स्मिता वाघ, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, नगरसेवक साहेबराव पवार, महेश देशमुख आणि भैरवी पलांडे यांच्या उपस्थितीत विजय धनराज पाटील, विश्वनाथ मिस्त्री आणि गोपाल वाघ या तीन उपोषणकर्त्यांना लिंबू सरबत देऊन त्यांचे बेमुदत आमरण उपोषण सोडविण्यात आले.

कत्तलखान्याविरोधातील आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन नगरपरिषद प्रशासनाने त्यासंदर्भातील कायदेशीर आणि तांत्रिक बाबींची पडताळणी सुरू केली होती. पालिकेने उपलब्ध कागदपत्रांची तपासणी केली असता २५ एप्रिल २०२५ रोजी मंजूर झालेल्या विकास आराखड्यानुसार संबंधित जागेवर कत्तलखान्याचे आरक्षण अथवा वापर दर्शविण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट झाले. सध्या लागू असलेल्या विकास योजनेत या जागेवर दफनभूमी आणि क्रमांक ६२ पार्कचे आरक्षण दर्शविण्यात आले आहे. याशिवाय कत्तलखान्याच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी पालिकेने बांभोरी इंजिनिअरिंग कॉलेजला पत्र दिले होते. महाविद्यालयाने १९ नोव्हेंबर २०२६ रोजी इमारत निष्कासित करण्याबाबत पत्र दिले. पालिकेचे कायदेशीर सल्लागार ॲड. किरण पाटील यांनीही कायदेशीर बाबींचा विचार करून कत्तलखाना निष्कासित करण्याचा सल्ला दिला. या सर्व बाबींच्या आधारे शनिवारी सकाळी ११ वाजता नगरपरिषदेत तातडीची विशेष सभा घेण्यात आली.

या विशेष सभेला नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, गटनेते पंकज चौधरी, अपक्ष गटनेते महेश देशमुख, साहेबराव पवार, दीपक चौगुले, सविता संदानशिव, अपूर्वा चौधरी, कैलास पाटील, सुवर्णा हटकर, श्रीराम चौधरी, सुयोग धनगर, रामकृष्ण पाटील, छाया बाळू पाटील, नीलिमा पाटील, कल्पना परदेशी, स्वाती परदेशी, सचिन कासार, प्रवीण पाटील, सचिन पाटील, स्वप्ना पाटील, भरत ललवाणी आणि विजय पाटील आदी नगरसेवक उपस्थित होते. सभेत ठराव क्रमांक २०२ मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम २६६ (२) अन्वये कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करून त्याची इमारत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुख्याधिकारी रोशन राजपूत यांनी अतिक्रमण विभागप्रमुख राधेश्याम अग्रवाल यांना निष्कासनाची कारवाई करण्याचे आदेश दिले.

खासदार स्मिता वाघ या प्रश्नःसाठी अमळनेर येथे ठाण मांडले असताना काल दुपारपासून नगरपरिषदेत उपस्थित राहून जिल्हा प्रशासनाशी वारंवार संपर्क साधला.

कत्तलखाना कायमस्वरूपी निष्कासित करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. नगरपरिषद उपायुक्त जनार्दन पवार यांनीही खासदारांच्या पाठपुराव्यानंतर अमळनेर येथे भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. विशेष सभेतील ठराव आणि प्रशासनाकडून कारवाईचे आदेश मिळाल्यानंतर प्रत्यक्ष निष्कासनाची तयारी करण्यात आली.

सायंकाळी पाचच्या सुमारास नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या बंदोबस्तात कत्तलखाना जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू केली. यावेळी डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, एपीआय गणेश अहिरे, एपीआय साजिद मन्सूरी, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड आणि नामदेव बोरकर यांच्यासह सात पोलीस अधिकारी आणि ६५ पोलीस कर्मचारी तैनात होते. कारवाई पूर्ण झाल्यानंतरआंदोलनकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा मुख्य मागणीच्या पूर्ततेने शेवट झाला.

कत्तलखाना जमीनदोस्त करण्याच्या मागणीसाठी विजय धनराज पाटील, विश्वनाथ मिस्त्री आणि गोपाल वाघ यांनी नगरपरिषदेसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. विशेष सभेत ठराव मंजूर होऊन प्रत्यक्ष कारवाई झाल्यानंतर खासदार स्मिता वाघ, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, साहेबराव पवार, महेश देशमुख आणि भैरवी पलांडे यांच्या हस्ते तिन्ही उपोषणकर्त्यांना लिंबू सरबत देण्यात आले. त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. त्यामुळे कत्तलखान्याच्या प्रश्नावरून सुरू झालेल्या आंदोलनाची अखेर झाली असून, शहरातील नागरिकांचे लक्ष आता संबंधित जागेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार पुढील नियोजनाकडे लागले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!