अमळनेर अंबऋषी टेकडीवर वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वड वृक्षारोपणाचा उपक्रम — नागरिकांचा सहभाग अपेक्षित
अमळनेर : विक्की जाधव
अंबऋषी टेकडी ग्रुपकडून उद्या, दिनांक १० जून रोजी वटसावित्री पौर्णिमा या पावन दिनानिमित्त एक विशेष पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येणार आहे. सकाळी ७ ते ९ या वेळेत टेकडी परिसरात वड वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी या उपक्रमात आपल्या पत्नींसह सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या निमित्ताने प्रत्येक विवाहित दांपत्याने आपल्या पत्नीच्या हस्ते वडाचे झाड लावावे, जे फक्त पर्यावरण रक्षणासाठीच नव्हे तर वटसावित्री व्रताच्या पवित्रतेचे प्रतीकही ठरेल. यासोबतच “एक वृक्ष आईच्या नावाने” या शासनाच्या योजनेंतर्गत देखील हा उपक्रम हाताळण्यात येणार आहे, असे आयोजकांनी सांगितले.

टेकडीवर भेट द्या – एक झाड लावा – पर्यावरणाचे रक्षण करा.
तुमच्या उपस्थितीने आणि सहकार्याने हा उपक्रम अधिक यशस्वी होईल, याची खात्री आयोजकांनी व्यक्त केली आहे.