ऑनलाईन बुकिंग सुविधेचा भावनिक शुभारंभ – श्री गोविंद महाराज भक्तनिवास भाविकांच्या सेवेसाठी खुले, संस्थेला Google मानांकनाचा सन्मान

अपनी भाषा में पढ़े! Translate

ऑनलाईन बुकिंग सुविधेचा भावनिक शुभारंभ – श्री गोविंद महाराज भक्तनिवास भाविकांच्या सेवेसाठी खुले, संस्थेला Google मानांकनाचा सन्मान

 

अमळनेर : विक्की जाधव

संत परंपरेच्या पवित्र पुण्यस्मरणातून साकार झालेल्या श्री गोविंद महाराज भक्तनिवास प्रकल्पाचा भाविकांच्या सेवेसाठी ऑनलाईन बुकिंग सुविधेचा शुभारंभ जेष्ठ शुद्ध एकादशी, शनिवार दिनांक ७ जून रोजी सायंकाळी ६ वाजता, भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या वेळी संत श्री प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या शुभहस्ते बुकिंग पोर्टलचे उद्घाटन झाले.

सखाराम महाराजांच्या प्रतिपंढरपूर अमळनेर येथील श्री सदगुरु सखाराम महाराज विठ्ठल-रुख्मिणी संस्थानच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या या भक्तनिवासात AC व Non-AC अशा रूम्स, अत्यंत अल्पदरात उपलब्ध करण्यात आल्या असून, घरबसल्या बुकिंग करण्यासाठी https://booking.sakharammaharaj.org या संकेतस्थळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बोरी नदीच्या सानिध्यात, समाधी वाडी मंदिर परिसरातील शांत आणि सात्विक वातावरणात उभारलेले हे भक्तनिवास भाविकांसाठी केवळ निवास नाही, तर एक आध्यात्मिक उर्जास्थान ठरत आहे. वाडीसारखी वास्तुशुद्ध रचना, ऊर्जा प्रवाह आणि सेवा तत्त्व यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाला आत्मिक समाधान अनुभवता येते.

या उद्घाटनप्रसंगी ट्रस्टी दिलीप देशमुख, महेश जोशी, येवले आप्पा, रमेश जोशी, सुनील अण्णा देव यांच्यासह अनेक सेवेकरी आणि भाविक उपस्थित होते. सर्वांनी या ऑनलाइन प्रणालीचे स्वागत करत, ही सेवा भाविकांसाठी अत्यंत सोयीची व कालानुरूप असल्याचे मत व्यक्त केले.

🌟 Google चे अधिकृत रेटिंग प्रमाणपत्र – आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव

 

“संत सखाराम महाराज समाधी मंदिर, अमळनेर” या नावाने गुगलवर मिळालेल्या उच्च दर्जाच्या रेटिंगनंतर, संस्थेला गुगलचे अधिकृत रेटिंग प्रमाणपत्र मिळाले आहे. या सन्मानाचे अनावरण देखील संत श्री प्रसाद महाराज यांच्या हस्ते या प्रसंगी करण्यात आले.

या वेळी बोलताना श्री. महाराज म्हटले, “ही मान्यता सखाराम महाराजांच्या कृपाशक्तीची आणि सेवेकऱ्यांच्या निष्ठेची जागतिक ओळख आहे.”

अलीकडच्या काळात समाधी मंदिर, भक्तनिवास सुविधा, वाडी परिसरातील सौंदर्यीकरण, स्वच्छता आणि भक्तसेवा व्यवस्थापनामध्ये लक्षणीय बदल झाल्याने, Google Reviews वर देखील हजारो भाविकांनी आपले समाधान व्यक्त केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!