पातोंडा खून प्रकरण : मध्य प्रदेशातून पाचही आरोपींना अमळनेर पोलिसांची शिताफीने केली अटक

अपनी भाषा में पढ़े! Translate

पातोंडा खून प्रकरण : मध्य प्रदेशातून पाचही आरोपींना अमळनेर पोलिसांची शिताफीने केली अटक

 

अमळनेर : विक्की जाधव 

दिनांक 29 मे 2025 रोजी पातोंडा गावच्या शिवारात मध्यप्रदेशातील कॉन्ट्रॅक्टर कैलाश प्रजापती (वय 45 वर्षे) याच्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले आणि त्यानंतर त्याचा खून करण्यात आला होता. या खून प्रकरणातील सर्व पाच आरोपींना अमळनेर पोलिसांनी शिताफीने मध्य प्रदेशातील दुर्गम भागातून अटक केली आहे.

खून प्रकरणातील अटकेत आलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत 

1. गोपाल साहूलाल धुर्वे (वय 35)

2. पंकज उमरावसिंग शिलू (वय 27)

3. सलीम निर्मलशहा धुर्वे (वय 22)

4. रोहित बुद्धसिंग शिलू (वय 19)

5. शिवम फुलसिंग शिलू (वय 18)

सर्व आरोपी रा. बिजाढाना, पो. इटावा, ता. तामिया, जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश येथील रहिवासी आहेत.

या आरोपींना अटक करण्यासाठी अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, हेड कॉन्स्टेबल विजय भोई (3162), कॉन्स्टेबल राहुल गोकुळ पाटील (686) आणि कॉन्स्टेबल राहुल नारायण पाटील (711) यांनी मध्य प्रदेशात जाऊन अतिशय कौशल्याने ही कारवाई केली.

याकामी पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव येथील मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांचे तांत्रिक सहाय्य अत्यंत मोलाचे ठरले.

या शिताफीच्या कारवाईबद्दल अमळनेर पोलिसांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. घटनास्थळापासून मध्यप्रदेशातील आरोपींपर्यंतचा प्रवास आणि अचूक अटक, ही पोलिसांच्या कार्यक्षमतेचे मोठे उदाहरण ठरली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!