मंत्रोच्चारांच्या गजरात श्री मंगळग्रह मंदिरात विष्णू पंचायन यागाचा शुभारंभ अधिकमासानिमित्त भाविकांची मोठी उपस्थिती; 

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260603-WA0912

मंत्रोच्चारांच्या गजरात श्री मंगळग्रह मंदिरात विष्णू पंचायन यागाचा शुभारंभ अधिकमासानिमित्त भाविकांची मोठी उपस्थिती;

अमळनेर : विक्की जाधव.

अधिकमासाच्या पावन पर्वानिमित्त येथील श्री मंगळग्रह मंदिरात पंचदिन साध्य विष्णू पंचायन यागाला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर वैदिक मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींनी मंदिर परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला. मुख्य यजमान डॉ. सुप्रीम पाटील यांच्यासह विनोद अग्रवाल, मनोहर दीक्षित व मंदार कुलकर्णी यांनी सपत्नीक पूजा-अर्चा करत यागाचा शुभारंभ केला. विविध वैदिक कर्मकांड, लक्ष्मी-नारायण पूजन, पुरुषसूक्त अभिषेक आणि सहस्त्र तुलसीपत्र अर्चन यामुळे वातावरणात आध्यात्मिक चैतन्य निर्माण झाले.

दुपारच्या सत्रात नवग्रह हवन, नारायणसहस्त्रनाम हवन व विशेष आहुतींनी धार्मिक सोहळ्याची भव्यता अधिक खुलून दिसली. त्यानंतर नाशिकचे प्रख्यात व्यास आचार्य हरिष कुलकर्णी गुरुजी यांनी अधिकमास महात्म्य कथेचे रसाळ निरूपण करत उपस्थित भाविकांना धर्म, संस्कार आणि भक्तीचे महत्त्व पटवून दिले. मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली असून पुढील चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आणि कथा-कीर्तनांच्या माध्यमातून भक्तीचा उत्सव रंगणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!