June 29, 2025 6:26 am

ग्रामपंचायत अधिकाऱ्यास ४०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

अपनी भाषा में पढ़े! Translate

ग्रामपंचायत अधिकाऱ्यास ४०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे युनिटने तामसवाडी ग्रामपंचायतीचे अधिकारी दिनेश वासुदेव साळुंखे (वय ५३) यांना ४०,००० रुपयांची लाच स्वीकारताना अमळनेर येथे रंगेहात पकडले.

तक्रारदार हे शासकीय बांधकामाचे ठेकेदार असून त्यांनी दलित वस्ती सुधार योजनेतून पाच लाख रुपयांचे रस्ते काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण केले होते. याच्या बदल्यात त्यांना चार लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आले. मात्र सदर बिलाची रक्कम अदा केल्याच्या मोबदल्यात साळुंखे यांनी तक्रारदाराकडे १० टक्के म्हणजेच ४०,००० रुपयांची लाच मागितली.

या तक्रारीनुसार १९ मे २०२५ रोजी लाचलुचपत विभागाने अमळनेर येथे सापळा रचून आरोपीला लाच स्वीकारताना अटक केली. आरोपी साळुंखे लाच घेऊन दुचाकीने पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याला पकडण्यात आले.

या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा मोबाईल ताब्यात घेऊन तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक श्री. सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

सर्व नागरिकांना आवाहन :

कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे (दूरध्वनी – 02562 234020 / टोल फ्री – 1064) येथे त्वरित संपर्क साधावा.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!