June 29, 2025 1:54 am

2019 ला दाखल झालेल्या खटल्यातून पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या कार्यकर्तेची निर्दोष मुक्तता..

अपनी भाषा में पढ़े! Translate

2019 ला दाखल झालेल्या खटल्यातून पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या कार्यकर्तेची निर्दोष मुक्तता..

 

अमळनेर : विक्की जाधव 

सहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्यासाठी संजीवनी ठरणारे निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण हे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले असून ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे या मागणीसाठी धरणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी १९ एप्रिल २०१९ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमळनेर येथे आले असतांना पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भद्रा प्रतीक मॉल समोरील रस्त्यावर मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफ्यासमोर धरण पूर्तीच्या मागणीची घोषणाबाजी करून काळे झेंडे दाखविले. या आंदोलनामुळे जनआंदोलन समितीचे प्रमुख माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, माजी कुलगुरू शिवाजीराव पाटील, अमळनेर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, शेतकी संघाचे माजी प्रेसिडेंट संजय पाटील यांचेसह सुनिल पाटील, देविदास देसले, अजयसिंग पाटील,महेश पाटील, सतिष काटे, रविंद्र पाटील,रामराव पवार , डी एम पाटील,नामदेव पाटील, सतिश पाटील आदिंना तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश सदगिर यांनी अटक करून भा.द.वी कलम १८८ व १४३ नुसार गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणात न्यायालयात ३० एप्रिल २०२२ रोजी शासनाच्यावतीने अमळनेर येथिल दिवाणी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

सदर खटल्याच्या सुनावणी प्रसंगी पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे आंदोलनकर्ते प्रत्येक सुनावणीला नियमित उपस्थित राहिले.आंदोलनकर्त्यांच्यावतीने मा. न्यायालयात पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे वकील अँड.दिनेश दयाराम पाटील यांनी सतत चार वर्षे चाललेल्या या खटल्यामध्ये अभ्यासपूर्ण युक्तिवाद केला. २ मे २०२५ रोजी झालेल्या अंतिम सुनावणीत मा.न्यायालय यांनी वरील सर्व आंदोलनकर्त्यांची फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम २५५(१) अन्वये भारतीय दंड संहिता कलम १८८, १४३ अन्वये उपरोक्त शिक्षापात्र गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली असल्याचा निर्णय २ रे सह-दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मा.ए.ए. जोंधळे यांनी नुकताच दिला आहे.

पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या या आंदोलनकर्त्यांमध्ये सेवानिवृत्त अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व सहकार, सामाजिक ,राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी तसेच विविध व्यावसायिक, दुकानदार, व्यापरी,शेतकरी यांचा समावेश आहे. आंदोलन करताना वेळोवेळी समितीचे हेमंत भांडारकर , भरत पाटील, सेवानिवृत्त पी.आय. गोकुळ पाटील , भरतसिंग परदेशी , देवानंद बोढरे,प्रशांत भदाणे आदींनी जामीन देत सहकार्य केले. आंदोलनकर्त्यांचे निर्दोष मुक्तता झाल्यामुळे समाजाच्या विविध स्तरातून आंदोलक पदाधिकारी आणि समितीचे वकील दिनेश पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!