June 29, 2025 5:13 pm

सैनिकांच्या दीर्घायुष्यासाठी सामूहिक हवनाने पावन झालेला मुंदडा इस्टेट येथील नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा!

अपनी भाषा में पढ़े! Translate

सैनिकांच्या दीर्घायुष्यासाठी सामूहिक हवनाने पावन झालेला मुंदडा इस्टेट येथील नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा!

 

अमळनेर : विक्की जाधव

धर्म, भक्ती आणि राष्ट्रसेवेचा अनोखा संगम ठरलेला श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अमळनेर शहरातील मुंदडा इस्टेट, गलवाडे रोड येथे दिनांक १२, १३ व १४ मे २०२५ रोजी अत्यंत उत्साहात, भक्तिभावाने व एकात्मतेने साजरा करण्यात आला.

धार्मिक पूजनविधी, मिरवणूक, विविध संस्कार आणि महाप्रसाद यांसोबत या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या वीर जवानांच्या दीर्घायुष्यासाठी व सुरक्षिततेसाठी करण्यात आलेले सामूहिक महामृत्युंजय हवन, सरस्वती हवन आणि महाकाल हवन.

या पवित्र यज्ञकुंडासमोर नागरिक, सैनिकांचे कुटुंबीय, महिला भगिनी, बालगोपाळ आणि ज्येष्ठ मंडळी एकत्र जमली. मंत्रोच्चारांच्या गजरात सैनिकांच्या नावाने आहुती अर्पण केल्या गेल्या. सैनिकांच्या कल्याणासाठी अशा प्रकारचे सामूहिक प्रार्थना व धार्मिक विधी प्रथमच घडल्याने परिसरात विशेष आध्यात्मिक व भावनिक वातावरण निर्माण झाले.

हवन विधीमध्ये सैनिकांच्या पत्नी व नातेवाईकांचा पुढाकार विशेष उल्लेखनीय ठरला. देशासाठी लढणाऱ्या वीरांचा सन्मान करत त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करताना अनेकांच्या डोळ्यांत श्रद्धेचे अश्रू तरळले. “देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या वीरांची सुरक्षितता व सुख-समृद्धी आमच्या पूजेमधून मागतोय,” असे भावनिक उद्गार अनेक भाविकांनी यावेळी व्यक्त केले.

या सोहळ्याला खान्देशभूषण श्री ओमप्रकाशजी मुंदडा आणि युवकांचे बिझनेस आयकॉन श्री अमेयजी मुंदडा यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. मंदिर बांधकामासाठी बांधकाम अभियंता श्री निश्चयजी अग्रवाल आणि त्यांच्या टीमचे योगदान उल्लेखनीय ठरले.

मिरवणुकीत डीजेच्या तालावर टाळ-मृदंगाचा गजर, रांगोळ्या, फुलांची सजावट आणि पूजन विधीने वातावरण भक्तिमय झाले होते. महाप्रसादासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.

विशेष म्हणजे, हवनाच्या निमित्ताने देशभक्तीचे संस्कार रुजवण्याचा हा प्रयत्न भाविकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला. सैनिकांसाठी अशा धार्मिक उपक्रमांचे आयोजन ही काळाची गरज असून, प्रत्येक समाजाने राष्ट्रसेवकांसाठी या पद्धतीने सदिच्छा व्यक्त कराव्यात, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

या भव्य सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी संदेश पाटील, अनिकेत देशमुख, मनोज शिंदे, भूषण उपासनी, जिजाबराव शिसोदे, गणेश शिंगारे, गिरधर पाटील, विशाल सूर्यवंशी, दीपक सोनावणे, अनिल पवार, आर. एस. पाटील, विजय चौधरी, राजेश पाटील, सुभाष पाटील, ऋषिकेश पाटील, रितेश विसपुते, योगेश चौधरी, विजय साळुंखे, प्रकाश पाटील, जितेंद्र चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.

धर्म, संस्कृती आणि राष्ट्रप्रेमाचा संगम असलेल्या या सोहळ्याने परिसरात पवित्रता आणि एकात्मतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!