परीट समाज्याचा उद्या होणार भव्य दिव्य मेळावा;श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे आयोजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

परीट समाज्याचा उद्या होणार भव्य दिव्य मेळावा;श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे आयोजन

(निलेश गायकवाड)

पुणे जिल्ह्यातील सर्व परीट समाज बांधवांना, पुणे शहर मधील सर्व समाज बांधवांना आणि पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण मधील सर्व समाज बांधवांना नम्रपणे विनंती करीत उद्या रविवार दिनांक 18 .5 .2025 रोजी सकाळी दहा वाजता पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामधील श्री.क्षेत्र रांजणगाव गणपती येथे श्री मोरया लॉन्स मंगल कार्यालयामध्ये परीट (धोबी) समाजाचा भव्य दिव्य मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री खंडेराव जी कडलक हे असून माजी प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार, माजी प्रदेशाध्यक्ष श्री. एकनाथराव बोरसे , माजी प्रदेशाध्यक्ष नानासाहेब नाशिककर यांच्यासह राज्यातील आजी-माजी पदाधिकारी पुणे जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी आणि सर्व तमाम समाज बांधवांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न होणार आहे.
.
सदर मेळाव्यामध्ये पुणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित नियुक्त अध्यक्ष श्री विकास अभंग यांना राज्याचे अध्यक्ष श्री खंडेराव कडलक यांच्या हस्ते पुणे जिल्ह्या अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देण्यात येणार तसेच पुणे जिल्ह्यातील परीट समाजासाठी योगदान देणाऱ्या आदर्श माता आणि समाजभूषण पुरस्कार चे वितरण परीट समज्याच्या सर्वांच्या उपस्थितीत उद्याच्या कार्यक्रमात संपन्न होणार आहे.

या मेळाव्यास पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामीण भागातील, शहरी भागातील पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड येथील समाज बांधवांनी उपस्थित राहणार आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!