June 29, 2025 11:28 pm

आई-वडील नसताना मामाकडून भाचीवर अत्याचार

अपनी भाषा में पढ़े! Translate

आई-वडील नसताना मामाकडून भाचीवर अत्याचार

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव

तालुक्यातील एकरुखी येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ऊसतोडीच्या कामासाठी अहमदनगर येथे गेलेल्या आई-वडिलांनी आपल्या मुलीला विश्वासाने भावाकडे ठेवले होते. मात्र, याच चुलत मामाने तिच्यावर सातत्याने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेची आई ऊसतोडीसाठी अहमदनगर येथे गेली होती. या काळात मामाने पीडितेच्या मुलीला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. आई-वडील परत आल्यानंतरही पीडितेला धमकावण्यात आले की, जर तू हा प्रकार कोणाला सांगितलास, तर तुझ्या मुलीला आणि वडिलांना मारून टाकेन.

या प्रकरणी २९ एप्रिल रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर आरोपी चुलत मामाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 64, 64(2)(M), 115, 352, 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!