राय फाउंडेशनतर्फे कामगार दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
अमळनेर : विक्की जाधव.
कामगार दिनानिमित्त राय फाउंडेशन, अमळनेर यांच्या वतीने आणि गणपती हॉस्पिटल व क्रिटीकेअरचे डॉ. पंकज संतोष महाजन यांच्या सौजन्याने अमळनेर येथील प्रसिद्ध आर. के. पटेल कारखान्यात भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
घर खरेदी करतांय फक्त मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स.
शिबिराचे उद्घाटन
शिबिराचे उद्घाटन मा. विनोद भैय्यासाहेब पाटील आणि मा. बिपीन बापूसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनावेळी उपस्थित मान्यवरांनी शिबिराच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आणि कामगारांच्या आरोग्याचे महत्व सांगितले.
तपासणीचे प्रकार
शिबिरात कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 100 ते 110 कामगारांची तपासणी केली गेली, ज्यामध्ये खालील तपासणींचा समावेश होता:
हृदयरोग तपासणी, क्षयरोग (टी.बी) तपासणी, दमा तपासणी, ईसीजी, रक्तातील साखर तपासणी, (शुगर)HbA1c न्युरोपॅथी तपासणी, लिपिड प्रोफाईल, ऍसिडिटी स्कोअर, इतर सर्वसामान्य आरोग्य तपासण्या
शिबिराचे यशस्वी आयोजन
मा. देवदत्त हरचंद संदानशिव, सचिव, राय फाउंडेशन, अमळनेर मा. तुषार देवदत्त संदानशिव, अध्यक्ष, राय फाउंडेशन, अमळनेर. हेमंत बेहरे, कामगार अधिकारी, आर. के. पटेल कारखाना मा. नारायण एकनाथ पाटील, युनियन नेते, आर. के. पटेल कारखाना
या सर्वांनी शिबिराच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले. कामगारांचे आरोग्य सुधारण्यासाठी शिबिर आयोजित करण्याचा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. उपस्थित कामगारांनी राय फाउंडेशनचे आभार मानले आणि अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन पुढेही करावे अशी मागणी केली.
कार्यकमाचा संदेश
या शिबिराद्वारे कामगारांच्या आरोग्याची तपासणी केली गेली, तसेच त्यांना आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. यामुळे कामगारांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होईल, असे आयोजकांनी सांगितले.