June 29, 2025 11:26 am

अमळनेर पालिकेचा पाणीपुरवठा विस्कटला अधिकाऱ्यांची कामाप्रती गैरहजेरी: तरुणाचे पालिकेसमोर आंघोळ करून अनोखा निषेध!

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर पालिकेचा पाणीपुरवठा विस्कटला अधिकाऱ्यांची कामाप्रती गैरहजेरी:

तरुणाचे पालिकेसमोर आंघोळ करून अनोखा निषेध!

 

अमळनेर : विक्की जाधव 

अमळनेर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे जनतेचा असंतोष उफाळून आला आहे. तांबेपुरा भागात सलग 15 दिवस पाणी न मिळाल्याने नागरिक त्रस्त झाले असून, अखेर शिवसेना उपशहर प्रमुख प्रवीण पाटील याने थेट अमळनेर नगरपालिका कार्यालयासमोर आंघोळ करून प्रशासनाला धक्का दिला!

 घर खरेदी करताय ? मुंदडा बिल्डर्स आहेचं की मुंदडा म्हणजे प्रतिक विश्वासाचं..

 

पाणी नाही… आंदोलन मात्र ठसठशीत !

नगरपालिकेच्या गलथान कारभाराविरोधात हे आंदोलन ठिणगी ठरले. पाणी मिळत नसेल, तर लोकांनी काय करायचं? हा सवाल करत प्रवीण पाटीलने अंगावर बादलीतून पाणी ओतून पालिकेच्या निष्क्रीयतेवर जोरदार टीका केली.

आंदोलनाचा तात्काळ परिणाम !

प्रवीण पाटीलने आंदोलन केल्यानंतर, सायंकाळी पालिकेने पाणीपुरवठा सुरू केला. विशेष म्हणजे, यावेळी नेहमीपेक्षा जास्त वेळ पाणीपुरवठा करण्यात आला! त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो – आंदोलन केल्याशिवाय नागरिकांचे प्रश्न सुटणार नाहीत का?

अधिकारी झोपलेत का?

नगरपालिका प्रशासनातील अनेक अधिकारी एकमेकांवर जबाबदारी झटकताना दिसत आहेत. फोन गेले तरी केवळ आदेश दिले जातात, प्रत्यक्ष हालचाल मात्र दिसत नाही. पण दुसरीकडे, जलपुरवठा विभागातील विशाल देवरे सारखे कर्मचारी खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरून काम करताना दिसतात. पाणीपुरवठा कोठे अडथळलेला आहे, हे पाहण्यासाठी ते स्वतः घटनास्थळी जातात आणि समस्या सुटेपर्यंत थांबतात. अशा कर्मचाऱ्यांची अमळनेर नगरपालिकेला नितांत गरज आहे.

पंधरा दिवसांचा ताप

अमळनेर शहरासह तांबेपुरा भागात गेले पंधरा दिवस पाण्याचा थेंबही न मिळाल्याने स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. प्रत्येक घरात अस्वच्छता, रोगराईचा धोका, आणि नाहक त्रास सहन करावा लागत होता. आंदोलनानंतर प्रशासनाची झोप उडाली, हे स्पष्ट दिसून आले.

नागरिकांचा सवाल — आंदोलन केल्याशिवाय जाग येणार नाही का?

या प्रकारानंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, “आम्हाला हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन का करावं लागतं?” असा संतप्त सवाल सामान्य जनतेतून उपस्थित होत आहे. पालिकेने आता तरी शहाणपणाने वागून नियोजनबद्ध व नियमित पाणीपुरवठा करावा, अशी जनतेची मागणी आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!