June 29, 2025 6:35 am

कर्मयोगीचे कामगार दिनाला भव्यदिव्य अन्नदान …

अपनी भाषा में पढ़े! Translate

कर्मयोगीचे कामगार दिनाला भव्यदिव्य अन्नदान …
५ हजार पेक्षा जास्त नागरीकांनी घेतला अन्नदानाचा आस्वाद…
जागतिक कामगार दिन हा कामगार वर्गासाठी सर्वात मोठा उत्सव परंतु आजच्या स्वार्थी जगात कामगार वर्गाला व भांडवलदार वर्गाला मोठं करण्यासाठी ज्या कामगारांनी आपले प्राण गमावले. त्यांच्याप्रती कृतज्ञत व्यक्त करत कामगार दिन साजरा करण्यासाठी कामगार, भांडवलदार, ठेकेदार कोणीही समोर यायला तयार नाही, परंतु गेल्या २०२२ पासून कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांच्या नेतृत्वात आशिया खंडातील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र बुटीबोरी येथे कर्तुत्ववान महिला कामगारांचे सत्कार, ठेकेदारीत काम करणाऱ्या कामगारांच्या मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत व अन्नदान करून कृतीतून कामगार दिन साजरा होत आहे.
यावर्षी सुद्धा कर्मयोगीने मेट्रो चौक बुटीबोरी येथे कामगार दिनाचे आयोजन करून सर्वप्रथम कर्मयोगी गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अन्नदानाची सुरवात करण्यात आली. कर्मयोगी फाऊंडेशनच्या अन्नदानाचा ५ हजार पेक्षा जास्त नागरिकांनी आस्वाद घेत या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाविषयी कर्मयोगी फाऊंडेशन अध्यक्ष पंकज ठाकरे सांगतात की कामगार दिन हा बंधुभाव वाढविणारा दिन आहे, त्यामुळे कामगार क्षेत्राशी निगडित असणाऱ्या सर्व लोकांनी तो कृतीतून साजरा करायला पाहिजे. परंतु तसे न होता फक्त जात, पंथ, धर्म यावर आधारित सण उत्सवासाठी लोकं एकत्र येतात, कामगार दिनाला सरकारी सुटी असूनही लोक त्याचा उपयोग फक्त स्वतःच्या करमणुकीसाठी करतात. परंतु ज्या लोकांनी कामगार वर्गाला चांगले दिवस आणून देण्यासाठी स्वतःचे बलिदान दिले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत, बंधुभाव वाढविण्यासाठी आम्ही कामगार दिन साजरा करतो.
या कार्यक्रमाला बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील नागरिक व कर्मयोगी परिवारातील सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!