June 29, 2025 11:16 am

अक्षय्य तृतीयेचे स्तंभारोपण होऊन संत सखाराम महाराज अमळनेर यात्रोत्सवाला प्रारंभ

अपनी भाषा में पढ़े! Translate

अक्षय्य तृतीयेचे स्तंभारोपण होऊन संत सखाराम महाराज अमळनेर यात्रोत्सवाला प्रारंभ

 

अमळनेर : विक्की जाधव 

अमळनेर येथील श्री संत सखाराम महाराज विठ्ठल रुखमई संस्थान वार्षिक यात्रोत्सव अक्षय तृतीया काल पासून सकाळी 9:30 वाजता बोरी नदीच्या वाळवंटात हभप प्रसाद महाराज यांच्या उपस्थितीत स्तंभारोपण व समाधी मंदिरांवर ध्वजारोहण होऊन यात्रेसवास सुरुवात झाली.

 घर खरेदी करतांय? मुंदडा बिल्डर्स आहेचं की मुंदडा म्हणजे प्रतिक विश्वासाचं..

भजन, कीर्तन आणि स्पर्धा :

३० एप्रिल ते ७ मे दरम्यान दररोज सकाळी ९ ते १२ या वेळेत तुकाराम महाराज गाथा भजन होईल.

३ ते ५ मे दरम्यान जिल्हास्तरीय भजन स्पर्धा होणार आहेत.

६ मे रोजी सखाराम महाराजांचे चवथे गादीपती हभप प्रल्हाद महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त हभप जयदेव बुवा गुरव यांचे कीर्तन होईल.

७ मे रोजी हभप मोहन महाराज बेलापूरकर यांचे आगमन होईल आणि दिंडी येईल.

रथोत्सव व भक्तांची गर्दी : 

८ मे (वैशाख शुद्ध मोहिनी एकादशी) रोजी सायंकाळी ७.३० वाजता रथोत्सव होणार आहे.

रथ मिरवणूक वाडी मंदिरापासून सुरू होऊन सराफ बाजार, दगडी दरवाजा, फरशी रोड, पैलाड मार्गे बोरी नदीतुन कसाली मार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी वाडी चौक येथे सकाळी पोहोचेल.

बुध्द पौर्णिमेला असेल पालखी मिरवणूक :

१२ मे रोजी सकाळी ६ वाजता वाडी चौकातून पालखी मिरवणूक निघणार असून त्यात भुसावळ व चाळीसगाव येथील बँड पथक, पालखी, आणि शेवटी पूज्य प्रसाद महाराज आणवाणी पायाने असतील

रथ मिरवणुकीप्रमाणेच पालखी मार्ग असेल.

१३ मे रोजी हभप मोहन बेलापूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होईल.

 

सुव्यवस्थेसाठी तयारी :

नगरपालिकेकडून नदी पात्रात स्वच्छता मोहीम सुरू असून पाण्याचे नियोजन करणे पालिकेवर मोठे टार्गेट आहे पोलिसांकडून चोख बंदोबस्ताची तयारी आहे. यासंदर्भात जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमळनेर दौऱ्यावर येतील अशी माहिती आहे.

महावितरणने यात्रेदरम्यान वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून नवीन फिडरची व्यवस्था केली आहे.

श्री सद्गुरू संत सखाराम महाराज विठ्ठल-रुख्मिणी संस्थान व हभप प्रसाद महाराज यांच्या वतीने सर्व भाविकांना यात्रोत्सवातील सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!