“घशाला थंडावाही, मनाला आनंदही!” – मंगला देवी मित्र मंडळ आणि संकल्प फाउंडेशनचा दिलासादायक उपक्रम
अमळनेर : विक्की जाधव
एप्रिल-मेच्या रणरणत्या उन्हात एखादं थंड पाणी पिण्याचं भाग्य लाभणं म्हणजे जणू एखादं आशीर्वादच! आणि असाच एक आशीर्वाद ठरतो आहे. मंगला देवी मित्र मंडळ आणि संकल्प फाउंडेशनचा पाणपोई उपक्रम – जो या उष्णतेने व्याकूळ झालेल्या अमळनेरकरांना थंडावा देतोय… केवळ घशाला नव्हे, तर मनालाही!
घर खरेदी करतांय ? मुंदडा बिल्डर्स आहेचं की मुंदडा म्हणजे प्रतिक विश्वासाचं..
दरवर्षीप्रमाणे यंदाही या मंडळाने मंगला देवी चौकात थंड पिण्याच्या पाण्याची पाणपोई बसवली आहे. ही केवळ सेवा नाही, ही आहे सामाजिक संवेदनशीलतेची सजीव प्रतिमा!
या वर्षी पाणपोईचं उद्घाटन स्व. संतोष सोनू शेटे (माजी प्रशासन अधिकारी, अमळनेर) यांच्या स्मरणार्थ करण्यात आलं. विशेष म्हणजे मंडळाचे सदस्य हर्षल महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं – समाजासाठी काम करत वाढदिवस साजरा करण्याचा हा आदर्श एक संदेश देतो: “उत्सव केवळ आपलाच नाही, तो समाजाचाही असावा.”
या वेळी पंकजभाऊ शेटे (अध्यक्ष, संकल्प फाउंडेशन), धरम हटकर, शुभम येवले, तुषार ठाकरे, निलेश निकम, राहुल बडगुजर, सागर सैंदाने, महेश मराठे, चेतन पाटील, पप्पू महेश्वरी, फकिरा महाजन, सोनू पाटील, यश येवले, अक्षय पोरवाल, भास्कर ठाकरे, धीरज शेटे आदी उपस्थिती होते.
हा उपक्रम केवळ एका पाणपोईपुरता मर्यादित नाही, तर ही आहे समाजासाठी थंडाव्याची वाट उघडणारी एक प्रेरणा! असे नागरिक बोलू लागले आहेत.