June 28, 2025 7:24 pm

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला

अपनी भाषा में पढ़े! Translate

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला

 

मार्मिक न्यूज नेटवर्क – विक्की जाधव

तालुका भोकर, जिल्हा नांदेड येथील एका अल्पवयीन मुलीला शेजारी राहणाऱ्या आरोपी मारुती यांनी, घरात कोणी नसताना, लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. सदर आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून, जिल्हा न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

जामिनासाठी अर्ज करताना आरोपीने दावा केला की, पीडित मुलगी आणि त्याच्यात प्रेमसंबंध होते आणि तिच्या संमतीनेच सर्व घटना घडली. मात्र, पीडित मुलगी केवळ १३ वर्षांची असल्याने तिची संमती कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरता येत नाही, असा जोरदार युक्तिवाद पीडितेच्या पालकांच्या वतीने अॅड. निलेश भागवत यांनी केला. त्यांना अॅड. संकेत कुंजीर यांनी सहकार्य केले.

या प्रकरणात पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा नोंदवण्यात आलेला असून, आरोपीने पीडितेच्या परिचयाचा गैरफायदा घेत गुन्हा केल्याचे न्यायालयाने नमूद केले. सर्व युक्तिवाद आणि पुरावे विचारात घेऊन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!