June 29, 2025 12:11 am

भिगवण मुस्लिम समज्याच्या वतीने पहेलगाम येथे निष्पाप नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल निषेध व्यक्त केला

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण मुस्लिम समज्याच्या वतीने पहेलगाम येथे निष्पाप नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल निषेध व्यक्त केला

(निलेश गायकवाड)

२२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरमधील पहेलगाम येथे निष्पाप नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल भिगवण मुस्लिम समज्याच्या वतीने पत्राद्वारे तीव्र नाराजी आणि दुःख व्यक्त करत भिगवण पोलीस स्टेशनं ला निवेदन दिले . ही घटना मानवतेविरुद्धचा एक भयंकर गुन्हा आहे आणि भारताची शांतता आणि एकता बिघडवण्याचा प्रयत्न आहे असे समज्याच्या वतीने सांगितले .

तसेच या हल्ल्यात २६ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि २० हून अधिक लोक जखमी झाले. आम्ही भिगवण मुस्लिम समाज या दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध करतो आणि पीडित कुटुंबांप्रती आमच्या संवेदना व्यक्त करतो. अशा घटना केवळ मानवी हक्कांचे उल्लंघन नाहीत तर देशाच्या सुरक्षेसाठी एक गंभीर आव्हान आहेत. सरकारने या घटनेची जलद आणि पारदर्शक चौकशी करावी आणि दोषींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली

यावेळी समस्थ भिगवण मुस्लिम समाज उपस्थित होता.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!