June 29, 2025 4:45 am

किशोर पाटील यांना महाराष्ट्र सन्मान पुरस्कार

अपनी भाषा में पढ़े! Translate

किशोर पाटील यांना महाराष्ट्र सन्मान पुरस्कार
मुक्ताईनगरच्या सुपुत्राचा सामाजिक कार्यासाठी गौरव

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील शेमळदे गावचे सुपुत्र श्री. किशोर पाटील यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल “महाराष्ट्र सन्मान पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार नॅशनल एज्युकेशन अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन व नॅशनल एकॉनॉमिक ग्रोथ टाईम्स या राष्ट्रीय संस्थांकडून देण्यात आला.

मुंबईतील अंधेरी येथील पंचतारांकित कोहीनूर कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये झालेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रसिद्ध हिंदी व मराठी अभिनेत्री आसावरी जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार श्री. पाटील यांना प्रदान करण्यात आला.

सध्या श्री. किशोर पाटील हे आमदार व माजी मंत्री श्री. अनिल पाटील (अमळनेर विधानसभा) यांचे स्वीय सहायक म्हणून कार्यरत असून, मुंबईत विविध कारणांसाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना मदत व मार्गदर्शन करण्याचे कार्य ते अनेक वर्षांपासून करत आहेत. त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला.

कार्यक्रमास पद्मश्री अच्युत पालव, एससीईआरटी पुण्याचे डॉ. अरुण सांगोलकर, संगीतकार घनशाम वासवाणी, डिजिटल तज्ज्ञ श्री. अमित देव, असोचेम नवी दिल्लीच्या उपाध्यक्षा सुजाता देव, गायिका मिश्तू बर्धन, तसेच निलकमल प्रकाशन, हैदराबादचे संचालक सुरेश शर्मा हे मान्यवर उपस्थित होते.

या पुरस्कारानंतर माजी मंत्री व आमदार अनिल भाईदास पाटील, मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील, सौ.जयश्री अनिल पाटील यांच्या सह सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सह शेमळदे ग्रामस्थ यांनी यांचे अभिनंदन केले असून सर्वत्र श्री. किशोर पाटील त्यांच्या कार्याची समाजात दखल घेतली जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!