June 29, 2025 12:07 am

करमाळा नगर परिषदेने सुरू केला मोकाट जनावरांसाठी कोंडवाडा (नागरिकांतून समाधान व्यक्त)

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा नगरपरिषदेचा अनेक वर्षांपासून बंद असलेला मोकाट जनावरांचा कोंडवाडा अखेर नव्याने पुन्हा सुरू करण्यात आला आहे. करमाळा शहरामध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मोकाट जनावरामुळे सातत्याने छोटे मोठे अपघात शहरामध्ये घडत होते. मागील काही वर्षांपूर्वी मोकाट जनावरांचा झुंडीमुळे एक जण मृत्यू पावला होता. तरीही नगरपरिषदेने जनावरांच्या बंदोबस्तासाठी ठोस पावले उचलली नव्हती. मात्र शहरातील विविध राजकीय, सामाजिक संघटना, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,इत्यादी संघटनांनी वेळोवेळी केलेल्या मागण्या व पाठपुराव्यामुळे तसेच किल्ला विभागातील लोकमान्य टिळक तरुण मंडळाने यावर्षी मोकाट जनावरांच्या प्रश्नावर गणेशोत्सवात देखावा सादर केला होता व सदर देखाव्याला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता त्यामुळे करमाळा पोलीस स्टेशन च्या वतीने मंडळाला उत्कृष्ट देखावा म्हणून क्रमांक ही देण्यात आला होता.
या सर्व बाबीची गंभीर दखल घेत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी किल्ला विभागातील जुने मुख्याधिकारी निवासाच्या बाजूला कोंडवाडा सुरू केला असून त्याकरिता वर्तमान पत्रात प्रसिद्धिकरण केले होते तसेच घंटागाडीद्वारे ही मोकाट जनावरांच्या मालकाना जनावरे स्वतः च्या जागेत बांधून ठेवण्यासाठी आवाहन केले होते. अन्यथा कोंडवाड्यात मोकाट जनावरे जमा करून दंडासहित वसुली मोकाट जनावर मालकाकडून करण्यात येईल असेही सूचित केले होते. परंतु नगरपरिषदेच्या आवाहनाला मोकाट जनावर मालकानी प्रतिसाद दिला नसल्याने नगरपरिषद सदरची जनावरे गोशाळेत पाठवणार असल्याची माहिती आरोग्य निरीक्षक पुजारी यांनी दिली.

तसेच पुढे बोलताना पुजारी यांनी सांगितले की, आम्ही पकडलेली मोकाट जनावरे आठ दिवसांच्या आत कोणीही घेऊन जाण्यासाठी आले नाहीत त्यामुळे ११ मोकाट जनावरांची रवानगी आज गोशाळेत करण्यात येणार आहे.
एकंदर नगरपरिषदेच्या या धडक कारवाईमुळे नागरिकात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून सदरची कारवाई कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता सुरू ठेवावी असाही नागरिकांचा सूर आहे.

वर्षानुवर्षे सोबत असलेले सवंगडी एक कोंडवाडयाच्या आत व एक कोंडवाडयाच्या बाहेर असे असताना त्यांच्यामध्ये न बोलता भावनिक संवाद व्यक्त होताना पहालया मिळालेला आज सकाळचा क्षण

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!