ग्रामपंचायतीच्या सभागृहात रणकंदन! — ‘पुन्हा दिसलास तर हातपाय तोडीन’, महिलेलाही शिवीगाळ
मार्मिक न्यूज नेटवर्क :
गावातील शांततेला तडा जात, हेडावे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात मोठा गोंधळ उडाला. एका सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबावर सभागृहातच थेट धमकी आणि मारहाणीचा प्रयत्न करण्यात आला.
कांतिलाल मोतीलाल पाटील यांच्या फिर्यादीनुसार, भास्कर रामदास पाटील (रा. हेडावे) यांनी त्यांना “तू येथे आलास तर जिवंत सोडणार नाही” अशी खुलेआम धमकी दिली. इतकेच नव्हे तर, त्यांची पत्नीला ही शिवीगाळ करत. सार्वजनिक ठिकाणी तिचा अपमान करण्यात आल्याचा आरोप आहे.
घर खरेदी करताय? मुंदडा बिल्डर्स आहेच की.. मुंदडा म्हणजे प्रतिक विश्वासाचं…
या प्रकरणात आणखी तिघांची नावेही पुढे आली आहेत यात मनीषा भास्कर पाटील, दिनेश नाना पाटील आणि हिरेश चंद्रकांत पाटील. या चौघांवर मिळून तक्रारदाराने गंभीर आरोप करत, त्यांच्यावर घरात घुसूनही मारहाण झाल्याचा दावा केला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून, पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 115, 351(2), 352, 324(4) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास गो.पो.नि रामकृष्ण कुमावत हे करत आहेत.