फार्मसी महाविद्यालयात ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिट्यूड टेस्ट सराव परीक्षेचे आयोजन
अमळनेर : विक्की जाधव
खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी. फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने GDC Classes यांच्या सहकार्याने ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिट्यूड टेस्ट (GPAT) ची ऑनलाइन सराव परीक्षा आयोजित करण्यात आली.
घर खरेदी करतांय ? मुंदडा बिल्डर्स आहेचं की मुंदडा म्हणजे प्रतिक विश्वासाचं..
या सराव परीक्षेत विद्यार्थ्यांनी नमुना प्रश्नपत्रिकांचा सराव केला. परीक्षा पद्धती, प्रश्नांचे स्वरूप आणि वेळेची मर्यादा या सर्व बाबी वास्तविक परीक्षेच्या धर्तीवर ठेवल्या गेल्या, ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला आणि तयारी अधिक भक्कम होण्यास मदत झाली.
सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण प्रा. देवेश प्र. भावसार यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची समज आणि आत्मविश्वास वाढवण्यास मोलाची मदत झाली.
या उपक्रमात सहभाग घेतलेल्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन आणि कौतुक प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन आणि फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. रविंद्र सोनवणे यांनी केले आहे.