आकाश गव्हाणे यांना पीएच.डी. पदवी प्रदान
अमळनेर : विक्की जाधव
अयोध्या नगर, अमळनेर येथील रहिवासी श्री. किशोर गव्हाणे यांचे ज्येष्ठ चिरंजीव आकाश किशोर गव्हाणे यांनी श्री जे. जे. टी. विद्यापीठ, राजस्थान येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी मिळवून कुटुंबाचे व गावाचे नाव उज्वल केले आहे.
घर खरेदी करतांय? मुंदडा बिल्डर्स आहेचं की..मुंदडा म्हणजे प्रतिक विश्वासचं..
दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी त्यांनी अंतिम वायवा परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण केली. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या अर्थशास्त्र विषयात कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हा मान मिळवला आहे.
आकाश गव्हाणे यांनी प्रताप कॉलेजमधून २०२१ मध्ये अर्थशास्त्र विषयात एम.ए.ची पदवी प्राप्त केली होती. पुढील शिक्षणासाठी त्यांनी राजस्थान गाठले आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून आपल्या संशोधन कार्याची भरभरून फलनिष्पत्ती साधली. संशोधन कालावधीत त्यांनी अनेक दर्जेदार मासिकांमध्ये संशोधनात्मक लेख प्रसिद्ध केले आहेत, जे त्यांच्या अभ्यासातील सखोलतेचे द्योतक आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल आकाश गव्हाणे यांचे कुटुंबीय, विशेषतः आई-वडील, तसेच संपूर्ण गव्हाणे परिवाराचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यावेळी प्रताप कॉलेजचे प्राचार्य डॉ. अरुण जैन, प्रा. शिवाजीराव पाटील, प्रा. पराग पाटील, डॉ. धीरज वैष्णव, डॉ. विजय तुंटे, डॉ. अमित पाटील, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हर्षवर्धन जाधव, डॉ. विजय मांटे, तसेच राकेश निळे, देवेंद्र कांबळे, नरेंद्र निकुंभ, नरेंद्र संदानशिव आणि शारदा सर्कल व अयोध्या नगर येथील सर्व रहिवाशांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.