June 29, 2025 4:24 am

भाजी विक्रेत्यांच्या पाठीशी सावंत गट ठामपणे उभा असून भाजी विक्रेते वर अन्याय होऊ देणार नाही – सुनील बापू सावंत, नेते सावंत गट

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा:- करमाळा शहरातील श्री देवीचा रोड या भागातील भाजी विक्रेते यांच्या वर सार्वजनिक बांधकाम विभाग जी कार्यवाही करत आहे ती बेकायदेशीर असून भाजी विक्रेते वर अन्याय होऊ देणार नाही असे सुनील बापू सावंत यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे
आज सकाळी अकरा वाजता सर्व भाजी विक्रेते व शहरातील नागरिकांच्या वतीने सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत, संजय आण्णा घोरपडे, बबनराव चाॅंदगुडे, गणेश शिंदे,आदी जणांच्या उपस्थित कार्यकारी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यात आले
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून श्री देवीचा रोड या भागात भाजी विक्रेते भाजी पाला विकुन आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवतात सदर भाजी विक्रेते हे नगरपरिषदेच्या जागेत भाजी विकतात व त्या जागेचे भाडे नगरपरिषदेचा अधिकृत ठेकेदार पावती फाडून जागा भाडे वसूल करतो परंतु सदर भाजी विक्रेते वर सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या दोन दिवसांपासून सदर जागेवर भाजी विक्रेते नी बसु नये यासाठी भाजी विक्रेते वर दबाव आणला जात आहे परंतु आज पर्यंत या भागात कोणतेही वाहतुकीसाठी अडथळा आलेला नाही व या भागातील नागरिकांना ची कोणतीही तक्रार नसताना काही राजकीय व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी तक्रारी करत असुन या भाजी विक्रेते वर अन्याय करत आहेत उद्या त्याचा उदरनिर्वाह चा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर भाजी विक्रेते एक अनोखे आंदोलन सोमवारी सकाळी अकरा वाजता करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे
सदर निवेदनावर छाया दिंगबर सिरसट, शब्बीर बागवान, अन्वर शेख ,सविता भुजबळ ,सुनील अडसूळ ,ज्योती चिंचकर, पांडुरंग जगदाळे ,सोहेल बागवान, रेश्मा राखुंडे ,अश्विनी चांदगुडे ,चिमण शिरसागर, तृप्ती रोडगे, आयान बागवान, लता शेळके ,सतीश रोडगे ,विरार पठाण ,लतिफा लियाकत शेख, मनीषा थिटे आदी जणांच्या सह्या आहेत निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई ,सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई ,कार्यकारी अभियंता अकलूज तालुका माळशिरस ,तहसीलदार करमाळा ,पोलीस निरीक्षक करमाळा यांना देण्यात आले आहे

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!