पाहलगाम येथे झालेल्या आतंकवाद्यांच्या हल्ल्याचा छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपने केला तीव्र निषेध
अमळनेर : विक्की जाधव
पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीय नागरिकांना लक्ष्य करण्यात आले. या हृदयद्रावक आणि अमानुष घटनेचा तीव्र निषेध आज अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप कडून करण्यात आला. देशभक्तीने भारलेली ही निषेध सभा शहराच्या मध्यवर्ती भागात भरली आणि अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले.
घर खरेदी करताय मुंदडा बिल्डर्स आहेच की.. मुंदडा म्हणजे प्रतिक विश्वासाचं..
शहरातील नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत रस्त्यावर उतरून या भ्याड हल्ल्याविरोधात आवाज बुलंद केला. महिलांनी भगिनी म्हणून, तर विद्यार्थ्यांनी भारताचे भावी नागरिक म्हणून आपला रोष वेक्त केला. शाळकरी मुलं, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती अशा विविध वयोगटातील लोक मोठ्या संख्येने यावेळी सहभागी झाले होते.
“भारतातील कुठलाही नागरिकास असुरक्षित वाटू नये, हे आमचं ध्येय आहे. पालगाम येथील प्रकार मानवतेवरच आघात करणारा आहे,” अशा शब्दांत छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपच्या सदस्यांनी आपली भूमिका मांडली.
या निषेध सभेत देशभक्तीपर घोषणां देण्यात आल्या “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “दहशतवाद मुर्दाबाद” अशा घोषणांनी परिसरात राष्ट्रप्रेमाची ऊर्जा संचारली. आणि सहभागी नागरिकांनी देशासाठी एकतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी हल्ल्यात बळी पडलेल्यां निष्पाप जीवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.