June 29, 2025 11:16 am

मेडद, ता. बारामती येथील काशीद गँग च्या 2 तडीपार गुंडांना माळेगाव पोलिसांनी केली अटक…

अपनी भाषा में पढ़े! Translate

मेडद, ता. बारामती येथील काशीद गँग च्या 2 तडीपार गुंडांना माळेगाव पोलिसांनी केली अटक…
बारामती (सह – संपादक – संदिप आढाव)
बारामती तालुक्यातील मेडद येथील काशिद गॅगच्या दोन तडीपार गुंडांना माळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
मेडद येथील कुप्रसिद्ध काशिद टोळीतील गुंड महेश ऊर्फ एक्का दत्तात्रय काशिद,सुरज ऊर्फ माऊली सोमनाथ काशिद (रा.मेडद ता.बारामती) यांना पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी १२ फेब्रुवारी २०२५ रोजी एका वर्षासाठी पुणे जिल्हा (पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालयसह) सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातुन एका वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते.
तरीही ही दोन गुंड कोणतातरी दखल पात्र गुन्हा करण्यासाठी मेडद गावच्या हद्दीत वावरत असल्याची गुप्त माहिती सहायक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे यांना मिळाल्याने गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक देविदास साळवे यांच्या पथकाने या तडीपार गुंडांचा शोध घेऊन ताब्यात घेतले आहे.
याबाबत कॉन्स्टेबल अमोल राऊत यांनी फिर्याद दिली असून तपास हवालदार सादिक सय्यद करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!