पाठ्यपुस्तक लेखकांचा गौरव करण्यासाठी बारामतीत विशेष सोहळा – पंचक्रोशी प्रकाशनचा स्तुत्य उपक्रम
बारामती(प्रतिनिधी : वर्षाचव्हाण)
पुणे जिल्ह्यातील मराठी साहित्यातील मान्यवर आजी-माजी पाठ्यपुस्तक लेखक, कवी, लेखिका यांचा यथोचित गौरव करण्यासाठी पंचक्रोशी प्रकाशन, बारामती यांच्या वतीने एक विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मराठी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या साहित्यिकांचा एकत्रित सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार असून, हा सोहळा पुण्याच्या साहित्यक्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.
या उपक्रमासाठी पंचक्रोशी प्रकाशनकडून पुणे जिल्ह्यातील सर्व पाठ्यपुस्तक लेखकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी आपला अल्प परिचय – नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, पाठ्यपुस्तक लेखनाचे वर्ष, लेखन प्रकार (कथा, कविता, निबंध इ.) आणि शीर्षकासह माहिती बाळासो कर्चे – ९५४५७५१३६७ या क्रमांकावर त्वरीत पाठवावी.
याचबरोबर आपल्या माहितीतील इतर पाठ्यपुस्तक लेखकांपर्यंत ह्या उपक्रमाची माहिती पोहोचवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
उपक्रमाची वैशिष्ट्ये:
1.सर्व मान्यवर साहित्यिकांचा एकत्रित सन्मान
2.मराठी साहित्यिकांच्या कार्याला मान्यता
3.समाजाला प्रेरणा देणारा उपक्रम
“साहित्यिकांचा सन्मान म्हणजे समाजाला दिलेले नवे बळ,” असा संदेश देत पंचक्रोशी प्रकाशनचा हा उपक्रम साहित्य व शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.