फार्मसी महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिन साजरा
अमळनेर : विक्की जाधव
खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी. फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर येथे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
घर खरेदी करताय मुंदडा बिल्डर्स आहेच की!
मुंदडा म्हणजे प्रतिक विश्वासाचं..
या उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरात औषधी गुणधर्म असलेले व मानवी आरोग्यास लाभदायक असे आवळा, रुद्राक्ष, इन्सुलिन, लिंबू, कण्हेर यांसह विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमात प्रा. देवेश भावसार, प्रा. अनिल बोरसे, प्रा. रविंद्र माळी, प्रा. प्रितम पाटील, प्रा. सतीश ब्राम्हणे, प्रा. प्रफुल्ल चव्हाण, प्रा. स्वप्नाली महाजन, प्रा. सुनीता चोपडे, प्रा. वर्षा पाटील, प्रा. छाया महाजन, प्रा. शिवानी शर्मा, प्रा. वैशाली कुलकर्णी, प्रा. गीता पाटील, प्रा. प्रगती पाटील, प्रा. हर्षदा पवार, प्रा. प्रियांका महाजन, प्रा. मानसी उपासनी यांच्यासह अनिल महाजन, कविता शिंपी, महेश सोनजे, ज्ञानेश्वर चौधरी, यश शिंपी, किशोर बुलके आणि कैलास कड यांनी सहभाग घेत महाविद्यालय परिसर सुशोभित केला.
या उपक्रमाचे कौतुक आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. संदेश बी. गुजराथी, फार्मसी विभागाचे चेअरमन मा. योगेशजी मुंदडे, मंडळाचे चिटणीस प्रा. पराग पी. पाटील, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन आणि फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र सोनवणे यांनी केले.