June 29, 2025 3:14 am

अंथुर्णे येथील महात्मा फुले व रमा माता कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

अपनी भाषा में पढ़े! Translate

अंथुर्णे येथील महात्मा फुले व रमा माता कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

पिंपरी बुद्रुक
दिनांक :16/04/2025
प्रतिनिधी – समाधान रजपूत.

वालचंदनगर : अंथुर्णे येथील महात्मा फुले कॉलनी व रमामाता कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव, बोधिसत्व, विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन लहान मुलांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी सामुदायिक त्रिशरण ,पंचशील बुद्ध वंदना घेण्यात आली.
यावेळी प्राध्यापक दिलीप लोंढे सर ,ऋषिकेश गंगणे सर तसेच सुनील केंगार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा थोडक्यात आढावा घेत , भारतीय संविधानाचे महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
जयंतीनिमित्त मोफत डोळ्यांचे शिबिर आयोजित केले होते या शिबिराचा 50 लोकांनी लाभ घेतला तसेच 40 लोकांनी अल्प दरात चष्मे वाटप करून घेतले तर दहा लोकांना मोतीबिंदू ऑपरेशन साठी पाठवण्यात आले .
महात्मा फुले कॉलनी व रमा माता कॉलनी वरील लहान व विद्यार्थी दशेतील मुलांना शिक्षणाविषयी आवड व प्रेरणा घेण्यासाठी या उद्देशाने कॉलनी वरील खडतर जीवन संघर्षातून प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, आर्मी, पोलीस ,अधिकारी ,पदांवरती कार्यरत असलेल्या उच्चशिक्षित अशा‌ 44 विभूतींचा डिजिटल बॅनर छापून त्यांचा सन्मान गौरव करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दोन्ही कॉलनी वरील कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!