अमळनेर मध्ये ग्रामपंचायत आरक्षण सोडत 21 एप्रिलला;
महिलांसाठी 60 जागा निश्चित..
अमळनेर : विक्की जाधव.
दि. १७ (जिमाका) – २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून, त्यासाठी २१ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४ वाजता तालुकास्तरावर सभा आयोजित करण्यात आली आहे.
या आरक्षणात एक द्वितीयांश पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहेत. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचा समावेश आहे.
अमळनेर तालुक्यातील आरक्षणानुसार सरपंचपदांची एकूण संख्या आणि महिलांसाठी आरक्षित पदांची माहिती पुढीलप्रमाणे आहे:
एकूण सरपंच पदे: ११९
अनुसूचित जातीसाठी आरक्षित: ६
अनुसूचित जमातीसाठी आरक्षित: १४
नागरिकांचा मागास प्रवर्ग: २३
सर्वसाधारण प्रवर्ग: ७६
महिलांसाठी आरक्षित पदे: ६०
अनुसूचित जातीच्या महिलांसाठी (अ): ३
अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी (ब): ७
मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी (क): १२
सर्वसाधारण महिलांसाठी (ड): ३८
या आरक्षण सोडतीनंतर पुढील निवडणुकीसाठी महिला नेतृत्वाला अधिक संधी उपलब्ध होणार आहे. या प्रक्रियेसाठी प्रशासनातर्फे सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे.