श्रीमती डी.आर. कन्या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
अमळनेर : विक्की जाधव.
श्रीमती डी.आर. कन्या शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करून अभिवादन केले.

या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक व्ही.एम. कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती आर.एस. सोनवणे यांनी “जय भीम कुणी म्हणावे” या विषयावर मनोगत व्यक्त केले, तर श्रीमती पी.डी. शेवाळे यांनी बाबासाहेबांचा जीवनप्रवास थोडक्यात सादर केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सूर्यवंशी मॅडम होत्या. कार्यक्रमास बी.एस. पाटील तसेच करुणा क्लबचे प्रतिनिधी डी.एन. पालवे यांची उपस्थिती लाभली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती पी.व्ही. साबे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.