स्व. पं. छगनशेठ भांडारकर व आर. के. केले फार्मसी कॉलेजमध्ये SOP Writing स्पर्धा
अमळनेर : विक्की जाधव
खान्देश शिक्षण मंडळ संचलित डी.फार्मसी व बी.फार्मसी महाविद्यालयात फार्मास्युटिक्स विभागातर्फे SOP Writing स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
प्रा. देवेश भावसार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात ५४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परीक्षक प्रा. वर्षा पाटील यांनी मूल्यांकन केले. प्रथम क्रमांक तन्वी पाटील व वैष्णवी जेठवा, द्वितीय हर्षदा भोई व वैष्णवी पाटील, तर तृतीय क्रमांक शिवानी परदेशी यांनी पटकावला. विजेत्यांना प्रा. पराग पाटील व प्रा. डॉ. रविंद्र सोनवणे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
कार्यक्रमास प्रा. रविंद्र माळी यांच्यासह अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.