June 29, 2025 3:41 pm

करमाळा येथे हनुमान चालीसाचा शंभरावा (१००) आठवडा पूर्ण

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा शहरामध्ये ऐतिहासिक असलेल्या किल्ला विभाग (किल्ला वेस) येथील पुरातन हनुमान मंदिरात आज हनुमान चालीसा चा शंभरावा आठवडा पूर्ण झाला आहे. सुरुवातीला दोन ते चार जणांनी एकत्रित येत हनुमान मंदिरात हनुमान चालीसा सुरू केली होती. आज त्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले असून शेकडो भाविक हनुमान चालीसा साठी उपस्थित राहत आहेत. यामध्ये बालकापासून ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वच जण सहभागी होत आहेत. मनाला प्रसन्न करणारे वातावरण या निमित्ताने निर्माण होत आहे. हनुमान चालीसा नंतर शाबूदाणा खिचडी, केळी व लाडू यांचा प्रसाद आलेल्या भाविक भक्तांना शिस्तबध्द पद्धतीने वाटप केला जातो. तसेच सदर प्रसाद देण्यासाठी नागरिकांचा ओघ वाढत असल्याने आयोजकांकडून नोंदणी करण्यात येत आहे. एकंदर पाहता किल्ला वेस येथे हनुमान चालीसा सुरू झाल्यापासून परिसरात भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!