June 29, 2025 3:00 am

राष्ट्रसंत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकर स्थापन करा आमदार अभिजित (आबा) पाटील यांची मागणी जोर धरून 

अपनी भाषा में पढ़े! Translate

राष्ट्रसंत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकर स्थापन करा आमदार अभिजित (आबा) पाटील यांची मागणी जोर धरून 

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव 

 

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्या अधिवेशनात परीट समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी “राष्ट्रसंत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळ” स्थापन करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. ही मागणी आमदार मा. अभिजित (आबा) पाटील यांनी प्रभावीपणे मांडत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे.

या महामंडळाच्या स्थापनेमुळे परीट समाजाला आर्थिक मार्गदर्शन, रोजगार निर्मिती, आणि व्यवसाय वृद्धीसाठी आधार मिळणार असून त्यांच्या सामाजिक स्थितीतही सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात परीट समाजाच्या गरजा, आव्हाने आणि विकासाच्या दिशा स्पष्ट करण्यात आल्या आहेत. पाटील यांच्या मते, ग्रामीण भागातील परीट समाजासाठी हे महामंडळ शिक्षण, व्यवसाय आणि सामाजिक सेवांमध्ये संधी निर्माण करेल.

याशिवाय, या महामंडळाच्या माध्यमातून युवकांना स्वरोजगारासाठी प्रोत्साहन, व्यावसायिक प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य देण्यावर भर दिला जाणार आहे. राज्य सरकार लवकरच या प्रस्तावास मान्यता देईल आणि परीट समाजाचा विकास वेगाने होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

आमदार अभिजित (आबा) पाटील यांच्या या पुढाकारामुळे परीट समाजाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी ठोस दिशा ठरेल, आणि त्याचा परिणाम त्यांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणांद्वारे दिसून येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!