भारतात पहिल्या हायड्रोजन ट्रेनची यशस्वी सुरुवात – हरित भविष्याकडे भारतीय रेल्वेचे मोठे पाऊल

अपनी भाषा में पढ़े! Translate

भारतात पहिल्या हायड्रोजन ट्रेनची यशस्वी सुरुवात – हरित भविष्याकडे भारतीय रेल्वेचे मोठे पाऊल

नवी दिल्ली(विशेष प्रतिनिधी/वर्षा चव्हाण)

भारतीय रेल्वेने इतिहास रचत देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणाच्या जींद ते सोनीपत या मार्गावर १ एप्रिल २०२५ पासून यशस्वीपणे धावायला सुरुवात केली आहे. ८९ किलोमीटर लांब या मार्गावर ५ एप्रिलपासून या ट्रेनचे ट्रायल्स सुरू झाले असून, यामुळे भारताने पर्यावरणपूरक आणि टिकाऊ वाहतुकीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

🔴ही आहेत हायड्रोजन ट्रेनची वैशिष्ट्ये:

1. हायड्रोजन इंधनावर चालणारी भारतातील पहिली ट्रेन

2. ११० किमी प्रतितास इतका कमाल वेग

3. १२०० हॉर्सपावर क्षमतेसह सुसज्ज

4. एकावेळी २६३८ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता

5. ८ कोच असलेली ही ट्रेन जगातील सर्वात लांब हायड्रोजन ट्रेनपैकी एक

6.शून्य कार्बन उत्सर्जन – पर्यावरणासाठी पूर्णतः सुरक्षित

चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार झालेली ही ट्रेन भारतीय रेल्वेच्या हरित तंत्रज्ञानातील पुढचे पाऊल मानली जात आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने २८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, एकूण ३५ हायड्रोजन ट्रेन तयार करण्यात येणार आहेत.

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे कार्बन उत्सर्जन कमी करणे व पर्यावरणीय शाश्वततेची जपणूक करणे. सध्या चालू असलेल्या ट्रायल्समधून या ट्रेनच्या तांत्रिक बाबी, सुरक्षितता आणि कार्यक्षमतेचा अभ्यास केला जात आहे. ट्रायल्स यशस्वी झाल्यानंतर या ट्रेनला नियमित सेवेत आणले जाणार आहे.

भारताच्या रेल्वे इतिहासातील हा क्षण केवळ तांत्रिक प्रगतीच नव्हे, तर हरित भविष्यासाठीचा मजबूत पाया ठरणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!