June 28, 2025 10:37 pm

मेडद, ता. बारामती येथे महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल…

अपनी भाषा में पढ़े! Translate

मेडद, ता. बारामती येथे महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल…
.
बारामती (विशेष प्रतिनिधी- संदिप आढाव)

जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या व मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून धक्काबुक्की करणाऱ्या विरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात एका पीडित महिलेने तक्रार दिली असून सदर घटना बारामती तालुक्यातील मेडद येथे घडली आहे.
पीडित महिला ही मेडद ग्रामपंचायत मध्ये काम करत असून दि. 13/03/2025 रोजी झालेल्या मासिक मीटिंगमध्ये गावचे सरपंच यांच्याकडे उपसरपंच आकाश बागाव, राजाराम विश्वनाथ गाडवे, निखिल विश्वास नागावडे, करुणा संतोष यादव, सोनाली निलेश नेवसे, विद्या अमोल गावडे, मालन दादासाहेब कांबळे यांनी कामावरून काढण्यासाठी अर्ज केला होता. अशी माहिती सरपंच गणेश काशीद यांनी दिली. यानंतर पीडितेने संबंधित लोकांना माझ्यासोबत तुम्ही असे का वागता , माझी काय अडचण आहे असे म्हणताच पीडिता ही हिंदू मांग समाजाची आहे हे माहित असताना तिच्या जातीच्या नावाने पाणउतारा करत ये मांगटे, तुला कामावरून काढले आहे, आता तुला तुझी लायकी दाखवतो असे म्हणून सर्वजण तेथून निघून गेले. यानंतर तेथे उभे असलेले ग्रामपंचायत कर्मचारी गणेश शिवाजीराव मोरे यांनी माझ्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.
पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून करुणा संतोष यादव, राजाराम विश्वनाथ गाडवे, सोनाली निलेश नेवसे, मालन दादासाहेब कांबळे, सर्व राहणार मेडद यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल आणि गणेश शिवाजी मोरे यांनी मनात लजा उत्पन्न होईल असे वर्तन करून धक्काबुक्की केल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड करत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!