June 29, 2025 3:18 am

खड्डे वाचवण्याच्या नादात लहान मोठे अपघात पारोळा – अमळनेर रस्त्यावरील प्रकार

अपनी भाषा में पढ़े! Translate

खड्डे वाचवण्याच्या नादात लहान मोठे अपघात
पारोळा – अमळनेर रस्त्यावरील प्रकार

प्रतिनिधी-तेजश्री प्रवीण पाटील

पारोळा व अमळनेर या दोन्ही तालुक्यांना जोडणारा व अत्यंत वर्दळीच्या रस्ता या रस्त्यावर शेकडो वाहनांची वर्दळ असतांना या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून गेले आहेत पारोळा व अमळनेर या दोन मुख्य तालुक्यांना जोडणाऱ्या या रस्त्यावर लहान मोठे खड्डे पडून गेलेले आहेत या खड्ड्यांच्या मुळे खडी आणि डांबर निघून गेले असल्याने या ठिकाणी सरळ वाहन चालवताना रस्ता उत्तम असल्याचे पहात वाहन चालक बिंदासपणे चालत असतात मात्र अचानक मोठमोठे खड्डे येणाऱ्या वाहन चालकांना दिसत नाहीत आणि अचानक दिसलेच तर हे खड्डे वाचविण्यासाठी वाहनाचा अचानक मोड बदलवला जातो आणि मागून येणाऱ्या किंवा पुढून येणाऱ्या वाहन चालकाला हे लक्षात न येत असल्याकारणाने या ठिकाणी लहान मोठे अपघात होत आहेत यामुळे अनेकांना या खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण होत आहे याबरोबरच या लहान मोठ्या अपघातात अनेकांना दुखापती देखील झाल्याचे सांगितले जात आहे या रस्त्यावर सर्वाधिक प्रमाणात त सडावण ते रत्नापिंप्री या ठिकाणी जास्त खड्डे दिसून येत आहेत रात्री अपरात्री या रस्त्याने येणाऱ्या वाहनांना अचानक येणाऱ्या या खड्ड्यांच्या मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने तसेच मोठ्या अपघात घडू नये यासाठी तात्काळ या खड्ड्यांची दुरुस्ती करून बुजवण्यात यावी अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!